एक्स्प्लोर

डोंबिवली MIDC चा गलथान कारभार, उघड्या चेंबरमध्ये पडून 60 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू

Dombivli MIDC Accident : या दुर्घटनेस एमआयडीसी प्रशासन जबाबदार असून त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी केली.

ठाणे : एमआयडीसीच्या उघड्या चेंबरमध्ये पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याण शीळ रोड टाटा पवर जवळ घडली आहे. रस्त्याने चालत असताना एका इसमाचा पाय घसरला आणि हा इसम थेट उघड्या असलेल्या चेंबरमध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झाला. बाबू धर्मा चव्हाण असे या मयत इसमाचे नाव आहे.

पाय घसरून चेंबर मध्ये पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. आजूबाजूच्या लोकांनी या इसमाला उपचारासाठी डोंबिवली मधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान या इसमाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कल्याण शीळ रोडवर या भागात अनेकदा उघड्या चेंबर्स बाबत नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र एमआयडीसीने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.

कल्याण पूर्वेकडील टाटा नाका गांधीनगर परिसरामध्ये एमआयडीसीचे उघडे चेंबर होते. रविवारी या ठिकाणाहून बाबू धर्मा चव्हाण हे चालत होते. यावेळी चव्हाण यांचा पाय घसरला आणि ते थेट बाजूलाच असलेल्या उघड्या चेंबरमध्ये पडले. एक इसम चेंबर मध्ये पडलाय हे आजूबाजूच्या नागरिकांनी पाहिलं. चव्हाण यांना तातडीने चेंबरच्या बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

बाबू चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांनी हॉस्पिटल परिसरामध्ये गर्दी केली होती. संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे चव्हाण यांचा बळी गेला.

आज आमचे वडील गेले, उद्या कोणाच्या बाबतीत अशी घटना घडू नये. आम्हाला न्याय पाहिजे अशी मागणी धर्मा चव्हाण यांच्या दोन्ही मुलांनी केली. हे चेंबर कायमच उघड असतं असा आरोप काशिनाथ चव्हाण आणि प्रवीण चव्हाण या त्यांच्या दोन्ही मुलांनी केला. या ठिकाणाहून अनेक गाड्या सुद्धा जात असतात. उद्या कोणताही अनुचित प्रकार दुसऱ्याच्या घरी घडू नये अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात आली.

दुसरीकडे संताप्त नागरिकांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका या ठिकाणी मांडली. तर याबाबत मोरेश्वर भोईर यांनी एमआयडीसी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. एमआयडीसीच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली आहे. एमआयडीसी 27 गावांच्या नागरिकांच्या जीवावर उठली आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुर्घटनेस एमआयडीसी प्रशासन जबाबदार असून त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Embed widget