Dombivli blast news : डोंबिवली पुन्हा स्फोटाने हादरली, एमआयडीसीमधील एमआयडीसी फेज-2 मधील कंपनीत ब्लास्ट
Dombivli blast News Live Updates: मुंबईजवळची डोंबिवली MIDC पुन्हा एकदा स्फोटाने हादरली. या स्फोटाचे प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊया...

Background
Dombivli blast news : मुंबईजवळची डोंबिवली MIDC पुन्हा एकदा स्फोटाने हादरली. डोंबिवली एमआयडीसी फेज-2 मध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात अनेक कर्मचारी जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. हा स्फोट इतका भीषण होता की हवेत धुराचे लोळ दिसत होते. इतकंच नाही तर या स्फोटामुळे डोंबिवलीतील रहिवाशी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. स्फोट झाला ती केमिकल कंपनी आहे. या घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबतची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
डोंबिवली MIDC स्फोट बॉयलरचा नव्हे, तर कशाचा?
डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटाबाबत आता एक नवी माहिती समोर आली आहे. कालपर्यंत ही दुर्घटना केमिकल कंपनीतील बॉयलरच्या स्फोटामुळे (Dombivli Blast) घडल्याचे सांगितले जात होते. मात्र, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी याबाबत एक नवीन माहिती दिली. आम्ही सकाळी या कंपनीत सर्वेक्षण केले. त्यावेळी अमुदान कंपनीत बॉयलर अस्तित्त्वातच नसल्याचे दिसून आले. हा जो स्फोट झाला आहे तो बॉयलर नव्हे तर रिअॅक्टरमुळे झाल्याचे दिसत आहे. आम्हाला रिअॅक्टरचा पाया आणि काही तुकडे याठिकाणी दिसून आल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सविस्तर वाचा.
Dombivli Blast: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे एमआयडीसी स्फोट दुर्घटनेच्या पाहणीसाठी डोंबिवलीत
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी डोंबिवली एमआयडीसी क्षेत्रातील उद्योजकांची संघटना "कामा" संघटनेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली . यावेळी दानवे यांनी उद्योजकांचे म्हणणे ऐकून घेतले तर सुरक्षिततेबाबत त्यांना सूचना देखील केल्या . या ठिकाणाहून अंबादास दानवे जखमींची भेट घेण्यासाठी एम हॉस्पिटल येथे गेले आहेत
























