Dombivili Fire : डोंबिवली एमआयडीसीमधून शिंदे सेनेचे लोक हप्ते गोळा करतात, संजय राऊतांचा गंभीर आरोप
अमित शाह गृहमंत्री झाल्यापासून सातत्याने जम्मू-काश्मीर अशांत आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार यांनी गृहमंत्र्याचा राजीनामा मागितला पाहिजे . त्यांच्या पाठिंब्यावर हे सरकार उभे आहे त्यांची जबाबदारी आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
ठाणे: डोंबिवली एमआयडीसीतील (Dombivili Fire) एका कंपनीत पुन्हा एकदा मोठी आग लागली आहे. स्फोटांचे आवाज येत असल्याने डोंबिवली हादरली आहे. यामुळे रहिवाशांमधे घबराट निर्माण झाली आहे. डोंबिवलीत पुन्हा आग लागल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. डोंबिवलीतील कंपन्यांमधून शिंदे गटाचे लोक किती हप्ते वसूल करतात हे आधी बघा. या ज्या घटना होतायत त्यांच्याकडे लक्ष द्या, असे राऊत बोलत होते. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, संपूर्ण एमआयडीसीमधून शिंदे सेनेचे लोक किती हप्ते गोळा करतात त्याचे आकडे द्यावे लागतील. एमआयडीसीमध्ये बेकादेशीर कामे सुरू आहेत. पोलिसांपासून शिंदेंच्या लोकांपर्यंत लाखो करोडोंचे हफ्ते कसे जातात हे तुम्ही एकदा तपासून घ्या.
चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमारांनी गृहमंत्री अमित शाहंचा राजीनामा मागितला पाहिजे : संजय राऊत
जम्मूतील हल्ल्यावर संजय राऊत म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथ विधी सुरू असताना जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी वैष्णो माताला जाणाऱ्या श्रद्धाळूंच्या बसवर हल्ला केला आणि त्यात 18 जण ठार झाले. त्यात लहान मुलांचा देखील समावेश होता. सातत्यांनी जम्मू मध्ये हल्ले सुरू आहे. आज देखील सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला झालं आणि जवान शहीद झाला. 370 कलम हटवून ही काश्मीरमध्ये शांतता नाही हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे. पुन्हा त्यांना गृहमंत्री पद दिल्यावर हल्ले सुरू झाले . अमित शाह भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेतात परंतु कश्मीरी पंडितांना त्यांच्या घरी पाठवू शकले नाहीत असा गृहमंत्री नरेंद्र मोदींनी आमच्या देशाच्या छातीवर बसवला आहे. देशाच्या असंख्य शहिदांचा अपमान केलेला आहे. कायदा सुव्यवस्थेचा विचार न करता राजकीय फायद्याचा विचार केला जातो. अमित शाह गृहमंत्री झाल्यापासून सातत्याने जम्मू-काश्मीर अशांत आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार यांनी गृहमंत्र्याचा राजीनामा मागितला पाहिजे . त्यांच्या पाठिंब्यावर हे सरकार उभे आहे त्यांची जबाबदारी आहे.
आमच्यासमोर धनुष्यबाणाचे 13 उमेदवार उभे केले गेले त्याचा फटका आम्हाला बसला : संजय राऊत
नाना पटोलेंच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, भाजपाने सुद्धा प्रयत्न केला होता पण छोटा, मोठा, मधला, धाकटा असं काही नसतं. एकमेकांच्या मदतीने आम्ही लोकसभा जिंकलो आहोत. आमच्यासमोर धनुष्यबाणाचे 13 उमेदवार उभे केले गेले त्याचा फटका आम्हाला बसला. सगळ्यात जास्त संघर्ष हा शिवसेनेच्या वाट्याला आला. आम्ही मोठ्या मनाने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रचारात स्वतःला झोकून दिलं . उद्या आम्हाला चार जागा मिळाल्या तरी आम्ही शेफारून बोललो नसतो सर्वांची मेहनत आहे. 158 जागांचा कौल जरी आमच्या बाजूने दिसाला असला तरी आम्हाला सावधगिरीने पावलं उचलावं लागतील. आमची अपेक्षा 180 ची आहे कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचे सरकारी येईल . आम्ही 30-31 जागा जिंकू असं म्हटलं होतं तेव्हा हे सगळे हसत होते. आम्ही 180 ते 185 जागा जिंकू . फडणवीस यांनी आता राजीनामा देऊ नये विधानसभेच्या निकालानंतर त्यांना जावेच लागणार आहे तेव्हा त्याला कोणी थांबवणार नाही.
Video :