जय जवान, शिवसाई, कोकण नगर, आर्यन्स...; प्रो गोविंदासाठी 16 संघ अंतिम फेरीत दाखल; उत्सुकता शिगेला
Gopalkala Pro Govinda 2024: प्रो गोविंदा सीझन २ पूर्व पात्रता फेरीत राज्यभरातील एकूण ३२ गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता.
Gopalkala Pro Govinda 2024: प्रो गोविंदा सीझन २ ची पूर्व पात्रता फेरी राज्यभरातील ३२ संघांनी सहभागी होत मोठ्या उत्साहात ठाणे येथील स्व. बाबुराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे झाली. यावेळी प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक, मुंबई टी २० लीग चेअरमन विहंग सरनाईक, डोम सिनेयुग कंपनीचे संचलाक अध्यक्ष मोहम्मद मोरानी, डोम एन्टरटेन्मेंटचे व्यवस्थापकीय संचालक मजहर नाडियादवाला आदी उपस्थित होते.
पूर्व पात्रता फेरीत राज्यभरातील एकूण ३२ गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. पूर्व पात्रता फेरीच्या दुसऱ्या दिवशी बाल उत्साही क्रीडा मंडळ, नुतन बालवाडी गोविंदा पथक, ओम साई सेवा मंडळ, आशीर्वाद मित्र मंडळ गोविंदा पथक, बालमित्र जिम गोविंदा पथक, आर्यन्स गोविंदा पथक, किसन नगरचा राजा, MMRDA गोविंदा पथक, शिव गणेश मित्र मंडळ गोविंदा पथक, अष्टविनायक गोविंदा पथक, जय जवान गोविंदा पथक, गावनीचा गोविंदा पथक, संघर्ष गोविंदा पथक, हिंदुराज गोविंदा, ओम ब्रम्हाण्ड साई गोविंदा पथक, विघ्नहर्ता गोविंदा पथक या पथकांनी आपले कौशल्य दाखवले. या फेरीतून अंतिम फेरीसाठी १६ संघांची निवड करण्यात आली आहे. अंतिम फेरी दि. १८ ऑगस्ट, २०२४ रोजी वरळीतील डोम एसव्हीपी स्टेडियम येथे होणार आहे.
आज झालेल्या पूर्व पात्रता फेरीत मानवी मनोऱ्यांचा अद्भूतपूर्व खेळ अनुभवण्यास मिळला. गोविंदांच्या क्रीडा कौशल्याला जगासमोर आणणे व या खेळाला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देणे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. मातीपासून ते मॅटपर्यंत दहीहंडीचा प्रवास पाहताना अतिशय समाधान वाटते, असे प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी सांगितले. १८ ऑगस्टला प्रो गोविंदा सीझन २ अंतिम सामन्यात १६ गोविंदा पथकांचा थरार पाहायला मिळेल. प्रो गोविंदा सीझन २ च्या माध्यमातून गोविंदा पथकांचे क्रीडा कौशल्य सर्वदूर पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न नक्की यशस्वी ठरेल, असेही पुर्वेश सरनाईक म्हणाले.
दहीहंडी उत्सव हा केवळ पारंपारिक खेळ म्हणून नव्हे तर या खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कबड्डी, क्रिकेटप्रमाणे या खेळाचे व्यावसायिकीकरण करून खेळाडूंना प्रोत्साहित करणे, खेळामधील सुरक्षितता वाढवणे तसेच प्रेक्षकांचा सहभाग वाढवणे हा या स्पर्धेमागील उद्देश आहे. प्रो गोविंदा सीझन २ च्या माध्मातून गोविंदा पथकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यातून अनेक खेळाडूंना प्रेरणा मिळते.
अंतिम फेरीत दाखल झालेले १६ संघ
आर्यन्स गोविंदा पथक, शिव साई गोविंदा पथक, कोकण नगर गोविंदा पथक, श्री आग्रेश्वर गोविंदा पथक, बालवीर गोविंदा पथक, ओम ब्रम्हांड साई गोविंदा पथक, यश गोविंदा पथक, विघ्नहर्ता गोविंदा पथक, हिंदमाता गोविंदा पथक, जय जवान गोविंदा पथक, ओम साई सेवा मंडळ, अष्टविनायक गोविंदा पथक, बाल उत्साही गोविंदा पथक, शिव गणेश गोविंदा पथक, हिंदू एकता गोविंदा पथक, साईराम गोविंदा पथक
प्रो गोविंदा सीजन लीग -2 क्वालिफाय टीम १६ सिलेक्शन-
क्रमांक (०१) आर्यन्स गोविंदा पथक - (२४.२२५मि.ली सेकंड)
क्रमांक (०२) शिवसाई क्रीडा मंडळ गोविंदा पथक - (३२.२३१मि.ली सेकंड)
क्रमांक (०३) कोकण नगर राजा गोविंदा पथक - (३३.००५मि.ली सेकंड)
क्रमांक (०४) श्री अग्रेश्र्वर गोविंदा पथक - (३३.५२४मि.ली सेकंड)
क्रमांक (०५) बालवीर गोविंदा पथक - (३५.१५४मि.ली सेकंड)
क्रमांक (०६) ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथक - (३६.४१३ मि.ली सेकंड)
क्रमांक (०७) यश गोविंदा पथक - (३७.५१४ मि.ली सेकंड)
क्रमांक (०८) विघ्नहर्ता गोविंदा पथक - (३७.९३३ मि.ली सेकंड)
क्रमांक (०९) हिंदमाता गोविंदा पथक - (४०.६०१ मि.ली सेकंड)
क्रमांक (१०) जय जवान गोविंदा पथक - (४२.२१मि.ली सेकंड)
क्रमांक (११) ओमसाई सेवा मंडळ गोविंदा पथक - (४२.८९मि.ली सेकंड)
क्रमांक (१२) अष्टविनायक गोविंदा पथक - (४३.३८ मि.ली सेकंड)
क्रमांक (१३) बाल उत्साही गोविंदा पथक - (५०.३२ मि.ली सेकंड)
क्रमांक (१४) शिवगणेश मित्र मंडळ गोविंदा पथक - (५२.१५ मि.ली सेकंड)
क्रमांक (१५) हिंदू एकता दहीहंडी पथक- (३८.७४ मि.ली सेकंड)
क्रमांक (१६) साई राम गोविंदा पथक - (४८.२७ मि.ली सेकंड)