लिंबू, काळा कपडा ते महिलांचे फोटो, भिवंडीतील स्मशानभूमीत अघोरी पूजा, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल
भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील पिंपळास गावातील स्मशानभूमीत अघोरी पूजा करणाऱ्या दोघां विरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Bhiwandi News : भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील पिंपळास गावातील स्मशानभूमीत अघोरी पूजा करणाऱ्या दोघां विरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस पाटील (Police Patil) यांनी दिलेल्या तक्रारी वरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कबीर दिलीप चौधरी व निखील संतोष पाटील अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळास गावातील कबीर दिलीप चौधरी व निखील संतोष पाटील या दोघांनी 29 जूनच्या मध्यरात्री ते 4 जुलै दरम्यान गावातील स्मशानभूमीत दोन अनोळखी महिलांचे फोटो लिंबूवर चिटकवून ते लिंबू काळ्या कपड्यामध्ये बांधले होते.अनोळखी महिलांच्या जीवाला धोका व्हावा या उद्देशाने जादुटोणा करण्यासाठी लिंबू बांधलेला काळा कापड पिंपळास गावातील स्मशानभुमीमध्ये ठेवला होता. ही बाब गावातील काही नागरिकांच्या नजरेस आल्याने गावाचे पोलिस पाटील अशोक उमाकांत जाधव यांनी याबाबत तक्रार दिली आहे. कोनगाव पोलिस ठाण्यात कबीर चौधरी व निखील पाटील यांच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुश अनिष्ठ व अघोरी प्रथा जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्या बाबत अधिनियम 2013 चे कलम 3 (2) व 3 (3) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रोहन गायकवाड हे करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
























