एक्स्प्लोर
शाओमी Mi Max 2 च्या किंमतीत कपात
शाओमीचे उपाध्यक्ष मनू जैन यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली.
मुंबई : शाओमीने Mi Max 2 या फोनच्या किंमतीत कपात केली आहे. यावर्षी जुलैमध्ये लाँच झालेला हा फोन आता 13 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. मोठी स्क्रीन आणि बॅटरी बॅकअप ही या फोनची ओळख आहे.
शाओमीचे उपाध्यक्ष मनू जैन यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली. Mi Max 2 च्या किंमतीत कायमस्वरुपी एक हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. या फोनच्या 32GB व्हेरिएंटची किंमत 13 हजार 999 रुपये आहे. जी अगोदर 14 हजार 999 रुपये होती. तर या फोनच्या 64GB व्हेरिएंटची किंमत 15 हजार 999 रुपये आहे.
Mi Max 2 चे फीचर्स
- अँड्रॉईड नॉगट 7.0
- 6.44 इंच आकाराची स्क्रीन
- 2GHz ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर
- 4GB रॅम, 32GB आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट्स
- 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि ड्युअल एलईडी फ्लॅश
- 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 5300mAh क्षमतेची बॅटरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement