एक्स्प्लोर
Advertisement
सतत मोबाईल गेम खेळणं मानसिक आजार : WHO
या व्यसनाची अनेकांना खूप मोठी रक्कम चूकवावी लागली आहे. मात्र तरीही गेम खेळणं काही थांबत नाही. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने एक मोठा निर्णय घेतला आहे.
पुणे : ऑनलाईन गेम खेळण्याची सवय ही तेवढ्यापुरती मर्यादित न राहता त्याचं हळूहळू वेड लागतं. नंतर त्याचं रुपांतर व्यसनामध्ये कधी होतं हे त्या व्यक्तीलाही कळत नाही. या व्यसनाची अनेकांना खूप मोठी रक्कम चूकवावी लागली आहे. मात्र तरीही गेम खेळणं काही थांबत नाही. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने एक मोठा निर्णय घेतला आहे.
मोबाईल किंवा कम्प्युटर गेम खेळणं अनेकांना आवडतं. सतत ऑनलाईन गेम खेळण्याच्या या व्यसनाला आतापर्यंत एक सवय म्हणूनच बघितलं जायचं. पण आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने गेम खेळण्याचं हे व्यसन एक मानसिक आजार असल्याचं सांगितलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने नुकतीच जाहीर केलेल्या इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसिजेस म्हणजेच जागतिक स्तरावरचे आजारांचे प्रकार यामध्ये ऑनलाईन गेम खेळण्याच्या व्यसनाला एक मानसिक आजार म्हटलं गेलं. सतत गेम खेळल्यामुळे आयुष्यातील इतर प्राधान्याच्या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याचंही यामध्ये नमूद करण्यात आलंय.
या कृतीमुळे निदान आतातरी ऑनलाइन गेम खेळण्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव होऊन त्याला आळा घालण्यासाठी पावलं उचलली जातील, असा जागतिक आरोग्य संघटनेचा उद्देश आहे.
ऑनलाईन गेम खेळण्याचं व्यसन असल्यास वागण्यात दिसून येणाऱ्या बदलांचे तपशील जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहेत.
महत्त्वाच्या दैनंदिन कृतींपेक्षा ती व्यक्ती गेम खेळण्यालाच जास्त पसंती देते
किती वेळ गेम खेळावी यावर त्या व्यक्तीचं नियंत्रण राहत नाही
आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊनही ती व्यक्ती गेम खेळणं सोडत नाही
वैयक्तिक, कौटुंबीक, सामाजिक आणि आयुष्यातील इतर भागांवर गेम खेळण्याचा परिणाम होत असल्यास त्याला व्यसन म्हणता येईल
ही लक्षणं किमान एक वर्षांपासून दिसत असल्यास त्याला मानसिक आजार म्हणता येईल
ऑनलाईन गेमबाबत तरुणाईला काय वाटतं?
ऑनलाईन गेम खेळण्याचं सगळ्याच वयोगटांमध्ये दिसून येतं. मात्र लहान मुलं आणि तरुणाई याच्या अधिकच आहारी गेल्याचं चित्र आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन गेम खेळण्यात थ्रिल वाटत असल्याचं तरुणाईचं म्हणणं आहे. त्याचसोबत उपलब्ध असणाऱ्या गेमच्या व्हरायटीज आणि त्याचे दररोज येणारे अपडेट्स यांमुळे आभासी विश्वात तरुणाई सतत रमलेली असते.
कोवळ्या वयातली मुलं पटकन या व्यसनाच्या आहारी जातात. त्यामुळे मुलांची यापासून जपवणूक करण्याची जबाबदारी पालकांवरही आहे, असं तज्ञ सांगतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या या निर्णयामुळे या व्यसनाच्या आधीन होण्याच्या आधीच सर्व जण सावध होतील अशी अपेक्षा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement