(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुगलचं तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष
तुमच्या सर्व हालचालींवर गुगल तुमच्या मर्जीशिवाय लक्ष ठेऊन आहे. तुमच्या हालचालींची सर्व माहिती गुगलकडे आहे.
मुंबई : तुम्ही कुठे आहात? तुम्ही कुठे जाता? तुमच्या सर्व हालचालींवर गुगल तुमच्या मर्जीशिवाय लक्ष ठेऊन आहे. तुमच्या प्रत्येक हालचालीची सर्व माहिती गुगलकडे आहे. एका रिपोर्टमध्ये या गोष्टीचा खुलासा झाला आहे. अॅन्ड्रॉईड आणि आयफोनमध्ये गुगलच्या अनेक सेवा आहेत, ज्या पर्सनल सेटिंग्सनंतरही तुमच्या लोकेशनचे रेकॉर्ड सेव्ह करत असल्याचं रिसर्चमध्ये समोर आलं आहे.
प्रिंसटनमध्ये कॉम्प्युटर सायन्स रिसर्चरने या गोष्टीचा खुलास केला आहे. अनेकदा गुगल तुमच्या पर्सनल माहितीचा वापर करण्यासाठी आधी परवानगी मागतो. गुगल मॅपसारखे अॅप वापरण्यासाठी गुगल तुमच्या लोकेशनची माहिती मागतो. तुम्ही परवानगी दिल्यानंतरच गुगल मॅप टाईमलाईनमध्ये हिस्ट्री दाखवतो.
मात्र तुमच्या प्रत्येक स्थितीची माहिती गुगलला असणे तुमच्या प्रायव्हसीसाठी धोकादायक आहे. यासाठी गुगलने एक पर्याय दिला आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमची माहिती देणे बंद करु शकता. ज्यामुळे तुमचं लोकेशन स्टोअर होणं बंद होतं. त्यामुळे तुम्ही कुठेही गेलात तरी तुमच्या लोकेशनची माहिती स्टोअर होणार नाही.
मात्र, तुमच्या लोकेशनची माहिती स्टोअर होणार नाही, ही बाब खरी नाही. लोकेशन हिस्ट्री बंद केल्यानंतरही गुगल अॅप तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या लोकेशनची माहिती स्टोअर करतो.
उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही गुगल मॅप ओपन करता त्यावेळी तुम्ही जिथे आहात त्या लोकेशनचा स्नॅपशॉट गुगल स्टोअर करतो. तसेच अॅन्ड्रॉईड फोनमध्ये हवामानाची माहिती देणारी सेवादेखील तुमचं लोकेशन स्टोअर करते.
याशिवाय चॉकलेट चिप कुकीज किंवा किंड्स सायन्स किट्ससारख्या सर्चद्वारेही तुमची अधिकाअधिक माहिती गुगल अकाउंटमध्ये सेव्ह केली जाते. जगभरातील दोन अरब अॅन्ड्रॉईड युजर्स आणि लाखो आयफोन युजर्ससाठी ही समस्या आहे, जे सर्च किंवा मॅपसाठी गुगलवर विश्वास ठेवतात.