एक्स्प्लोर
30 जूननंतर या स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप होणार बंद
मुंबई : प्रसिद्ध मेसेजिंग अप व्हॉट्सअप येत्या 30 जूनपासून काही ऑपरेटिंग सिस्टीमवर उपलब्ध नसेल. सध्या व्हॉट्सअप आपल्या वापरकर्त्यांना अनेक नवनवीन फिचर्स देत आहे. यातच आता ज्या फोनवर हे फिचर्स चालत नाहीत अशा फोनवर व्हॉट्सअप वापरता येणार नाही.
व्हॉट्सअप मुख्यत्त्वानं गुगलच्या अँड्रॉईड आणि अपलच्या आयओएसवर वापरलं जातं. व्हॉट्सअपवर मेसेजिंगसोबतच व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलसारख्या सुविधा मोफत उपलब्ध आहेत. तसंच नुकत्याच जीआयएफ फाईलही व्हॉट्सअपवरुन पाठवता येतात. मात्र काही स्मार्टफोनवरुन ही सेवा 30 जूननंतर वापरता येणार नाही.
नोकियाच्या सिंबियन ऑपरेटिंग सिस्टीमवर आणि ब्लॅकबेरी 10 ऑपरेटिंग सिस्टीमवर व्हॉट्सअप 30 जूननंतर वापरता येणार नाही. सिंबियन ऑपरेटिंग सिस्टीमच्या एस40 आणि एस 60 सिरीजच्या फोनवर व्हॉट्सअप उपलब्ध नसेल. नोकियाच्या जवळपास सर्वच हायएन्ड फोनवर सिंबियन ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आहे.
व्हॉट्सअपनं डिसेंबर 2016 नंतरच या फोन मॉडेल्सवर अप चालणार नसल्याचं जाहीर केलं होतं. मात्र ती मुदत वाढवत आता 30 जूननंतर या स्मार्टफोनवर व्हॉट्सअप वापरता येणार नाही. तसंच डिसेंबर 2017 नंतर अँड्रॉईड 2.2 Froyo, विंडोज 7 आणि आयओएस 6 वरही काम करणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement