WhatsApp चे भन्नाट फिचर, Google आणि Microsoft ला देणार टक्कर
Whatsapp New Feature : कॉल लिंक्सच्या मदतीने व्हॉट्सअॅप वापरकर्ते चालू असलेल्या कॉलमध्ये नवीन कॉल सुरू करू शकतात. कॉल लिंक्सचा पर्याय अॅपच्या कॉलिंग टॅपमध्ये आढळेल.
![WhatsApp चे भन्नाट फिचर, Google आणि Microsoft ला देणार टक्कर WhatsApp New Feature WhatsApp takes an aim at Google Meet Zoom with its new feature WhatsApp चे भन्नाट फिचर, Google आणि Microsoft ला देणार टक्कर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/27/5b7241c74da85ec1bf41e22d5c19a8d71664292699844328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Whatsapp New Feature : सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात व्हॉट्सअॅप हे सर्वात जास्त वापरले जाणारे फिचर आहे. याच व्हॉट्सअॅपने आता आपले एक भन्नाट फिचर आणले हे. कॉल लिंक्स असे या फीचरचे नाव आहे. व्हॉट्सअॅपचे हे नवे फीचर Google आणि Microsoft ला देखील टक्कर देणार आहे. नुकतेच व्हॉट्सअॅपने आपल्या या नवीन फिचरची घोषणा केलीय. व्हॉट्सअॅपने आपल्या नवीन फिचरची घोषणा केली आहे. नव्या फिचरच्या मदतीने तुम्ही कोणत्याही कॉलची लिंक जनरेट करून कोणालाही सहज पाठवू शकता. व्हॉट्सअॅपच्या या फीचरची लोक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते.
व्हॉट्सअॅपच्या या नव्या फिचरमुळे ते Google आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करण्यास सक्षम असेल. वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी कंपनी आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये सतत सुधारणा करत असते. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी व्हॉट्सअॅप आपले नवीन फिचर आणले आहे.
कॉल लिंक्सच्या मदतीने व्हॉट्सअॅप वापरकर्ते चालू असलेल्या कॉलमध्ये नवीन कॉल सुरू करू शकतात. कॉल लिंक्सचा पर्याय अॅपच्या कॉलिंग टॅपमध्ये आढळेल. वापरकर्ते ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल दोन्हीसाठी लिंक तयार आणि शेअर करू शकतात. मेटाने दिलेल्या माहतीनुसार, या आठवड्याच्या अखेरीस व्हॉट्सअॅपची ही नवीन सेवा सुरू होईल. यासाठी वापरकर्त्याला आपले व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागेल. आपल्या मोबाईल मधील व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतरच तुम्हाला या नव्या फिचरचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती मेटाने दिली आहे.
व्हॉट्सअॅप लवकरच आणणार आणखी एक फिचर
कॉल लिंक्स नंतर व्हॉट्सअॅप लवकरच आणखी एक नवे फिचर आणणार आहे. या फिचरमध्ये व्हॉट्सअॅपच्या व्हिडीओ कॉलवर 32 लोक एकावेळी कनेक्ट होऊ शकतील. कंपनी या फीचरची चाचणी सुरू करणार आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे.
नव्या फिचरच्या मदतीने युजर्स कॉलची लिंक त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांना शेअर करू शकतील. या लिंकवर क्लिक करून वापरकर्ते सहजपणे कॉलशी होतील. व्हॉट्सअॅपचे हे फिचर्स Google Meet किंवा Microsoft Teams प्रमाणेच काम करेल.
कॉल लिंक्स कशी तयार करणार?
व्हॉट्सअॅपचे हे नवे फिचर Android, iOS आणि Windows च्या कोणत्या ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करेल हे मेटाने अद्याप स्पष्ट केलेले नाही. कॉल लिंक तयार करण्यासाठी वापरकर्त्यांना कॉल टॅबमधील कॉल लिंक्स तयार करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल. येथून वापरकर्ते ऑडीओ आणि व्हिडीओ कॉलसाठी लिंक तयार करू शकतील.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)