एक्स्प्लोर
Vivo चे दोन स्मार्टफोन स्वस्त, काय आहेत वैशिष्ट्ये?
हे दोन्ही स्मार्टफोन भारतात मागील वर्षी लॉन्च करण्यात आले होते.

मुंबई : विवो Y93 आणि Y95 या स्मार्टफोनच्या भारतातील किंमती कमी करण्यात आल्या आहेत. कंपनीने Y93 च्या 3GB, 4GB रॅम व्हेरिअंट आणि Y95 किंमत कमी केली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन भारतात मागील वर्षी लॉन्च करण्यात आले होते. या फोनमध्ये अँड्रॉईड 8.1 ओरिओ आणि वॉटरड्रॉप स्टाईल नॉच मिळणार आहे.
विवो Y93च्या 3GB, 64GB व्हेरिएंटची किंमत आता 12,990 रुपयांवरुन 11,990 रुपये झाली आहे. तर 4GB, 32GB व्हेरिएंटची किंमत आता 13,990 रुपयांऐवजी 12,990 रुपये झाली आहे.
दुसरीकडे विवो Y95 आता 15,990 रुपयांऐवजी 14,990 रुपयांमध्ये मिळणार आहे. हा स्मार्टफोन केवळ 4GB, 64GB व्हेरिएंटमध्येच मिळतो.
Y93 हा स्मार्टफोन विवोने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात लॉन्च केला होता.
अँड्रॉईड - 8.1 ओरिओ, FunTouch OS 4.5 UI
स्क्रीन - 6.2-इंच HD+ (720x1580 पिक्सल) Halo फुल व्ह्यू डिस्प्ले
प्रोसेसर - ऑक्टा-कोर MediaTek Helio P22 प्रोसेसर
कॅमेरा - ड्यूएल कॅमेरा सेटअप, प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सेल, सेकंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सल, फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सेल
बॅटरी - 4,030mAh
तर विवो Y95 हा स्मार्टफोन मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतात लॉन्च केला होता.
अँड्रॉईड - 8.1 ओरिओ बेस्ड Funtouch OS 4.5 UI
प्रोसेसर - ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439
स्क्रीन - 6.22-इंच HD+ (720x1520 पिक्सेल) फुल-इनसेल Halo फुल व्ह्यू डिस्प्ले
कॅमेरा - ड्यूएल कॅमरा सेटअप, प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सेल, सेकंडकी कॅमेरा 2 मेगापिक्सेल, फ्रंट कॅमेरा 20 मेगापिक्सेल कॅमेरा
बॅटरी - 4,030mAh
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
