एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'धुलाई के बाद सिलाई', सेहवागचं रॉस टेलरला उत्तर
सेहवाग टेलरला ‘दर्जी’ असं संबधतो, तर टेलरही सेहवागला त्याच्याच स्टाईलने उत्तर देतो.
मुंबई: टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज रॉस टेलर यांच्यातील ट्विटरवरील जुगलबंदी आता नेहमीची झाली आहे. सेहवाग टेलरला ‘दर्जी’ असं संबधतो, तर टेलरही सेहवागला त्याच्याच स्टाईलने उत्तर देतो.
टेलरने दुसऱ्या टी ट्वेण्टी सामन्यातील विजयानंतर सेहवागला हिंदीत ट्विट करुन ‘ललकारलं’ होतं. त्याला सेहवागने टीम इंडियाच्या तिसऱ्या आणि मालिका विजयानंतर उत्तर दिलं.
सेहवाग म्हणाला, “धुलाई के बाद सिलाई.. न्यूझीलंडचे खेळाडू चांगले खेळले. भारताचा विजय छान होता. न्यूझीलंडकडून हरल्यानंतर कधीच वाईट वाटत नाही, कारण ते खेळाडू खरंच चांगले आहेत”.
https://twitter.com/virendersehwag/status/927952613844205568
टेलर काय म्हणाला होता?
राजकोटमधील दुसऱ्या टी ट्वेण्टी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 40 धावांनी पराभव केला होता.
यानंतर टेलरने राजकोटमधील एका शिंप्याच्या बंद दुकानाचा फोटो शेअर केला. त्याखालील कॅप्शनमध्ये टेलरने सेहवागला मेन्शन करुन “राजकोटमध्ये मॅच के बाद दर्जी (टेलर) की दुकान बंद, अगली सिलाई त्रिवेंद्रम में होगी, जरुर आना” असं म्हटलं होतं.
https://twitter.com/RossLTaylor/status/927121062239920128
टेलरच्या या ट्विटनंतर सेहवागनेही त्यापुढे मजल मारली. सेहवागने थेट यूआयडीआय अर्थात आधार कार्ड ट्विटर हॅण्डलला मेन्शन करुन, टेलरला आधार कार्डसाठी पात्र असल्याचं म्हटलं.
सेहवाग म्हणाला, “टेलर, तुझ्या भाषेमुळे मी खूपच प्रभावित झालो. @UIDAI टेलरच्या हिंदी भाषेचं कौशल्य पाहता तो आधार कार्डसाठी पात्र ठरेल”
यापूर्वीचं ट्विट
यापूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यानंतरही टेलर -सेहवागमध्ये ट्विट मस्करी रंगली होती. न्यूझीलंडने हा सामना 6 विकेट्स राखून जिंकला होता.
त्यावेळी सेहवाग म्हणाला होता, ‘“वेल प्लेड दर्जीजी, दिवाळीतील (कपडे शिवण्याच्या) ऑर्डरच्या दबावानंतरही चांगली कामगिरी केली”
सेहवागच्या या ट्विटला रॉस टेलरने हिंदीत उत्तर दिलं होतं. संबंधित बातमीसाठी क्लिक करा
सेहवागकडून टेलरचा ‘दर्जी’ उल्लेख, टेलरचंही हिंदीतून उत्तर
...अगली सिलाई त्रिवेंद्रम में, टेलरकडून सेहवागची फिरकी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement