App Locker : तुमच्या मोबाईलमधला डेटा सुरक्षित ठेवायचा आहे? 'या' स्टेप्सचा वापर करा
Data Privacy : तुम्हाला मोबाईल लॉक आणि अॅप लॉक या दोन्हीसाठी वेगळा पासवर्ड ठेवावा लागेल. जेणेकरून तुमचा डेटा पूर्णपणे सुरक्षित राहील.
Data Privacy : अनेक स्मार्टफोन यूजर्स आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा हाईड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून (Google Play Store) एक अॅप डाऊलोड करतात. आणि त्या अॅपच्या आधारे आपला डेटा सुरक्षित ठेवतात. मात्र, तुम्ही डाऊनलोड करत असेलेल अनेक अॅप हे सुरक्षित आहेत की नाही याची खात्री देता येत नाही. त्यामुळे तुम्ही सुरतक्षित केलेला डेटा खरंच सुरक्षित आहे का? याची देखील खात्री देता येत नाही. सध्याच्या सर्वच अन्ड्रॉइड मोबाईलमध्ये एक फिचर देण्यात आलं आहे. या फिचरमुळे तुमचा डेटा चोरी होण्याची किंवा गैरवापर करण्याची काही चिंता करण्याची गरज नाही. या ठिकाणी आम्ही तुम्हाला याच फिचरबद्दल माहिती सांगणार आहोत.
हे फिचर कसे वापराल?
आता एकापेक्षा एक लेटेस्ट स्मार्टफोन बाजारात येत आहेत. या स्मार्टफोनमध्ये एक खास फीचर इन बिल्ट आहे. अॅप लॉक (App Lock) असं या फिचरचं नाव आहे. या फिचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
- यासाठी आधी फोन सेटिंग अॅप ओपन करावे लागेल.
- सेटिंग्ज अॅपमधील प्रायव्हसी या ऑप्शनवर क्लिक करा.
- यामध्ये तुम्हाला अनेक ऑप्शन्स मिळतील. यामध्ये एक ऑप्शन अॅप लॉकचा असेल. त्यावर टॅप करा.
- आता मोबाईल तुमच्या लॉक पॅटर्नसह Verify करण्यास सांगेल. यासाठी तुम्ही जो काही पॅटर्न सेट केला आहे, तो Verify करा म्हणजे अनलॉक करा.
अॅप लॉकर Unable केले जाईल
अनलॉक केल्यानंतर, तुम्हाला अॅप लॉक Unable करण्याचा ऑप्शन दिला जाईल. जेणेकरून तुम्ही ते Unable करू शकता. तुम्ही ते Unable करताच, मोबाईलमध्ये असलेल्या सर्व अॅप्सची लिस्ट तुमच्यासमोर येईल. आता तुम्ही ज्या अॅपला लॉक करू इच्छिता त्यावर क्लिक करून लॉक करू शकता.
त्याचप्रमाणे, जेव्हा तुम्हाला लॉक अॅप उघडायचे असेल, तेव्हा तुम्ही ते त्याच पद्धतीने ओपन करू शकता. मात्र, तुम्हाला मोबाईल लॉक आणि अॅप लॉक या दोन्हीसाठी वेगळा पासवर्ड ठेवावा लागेल. जेणेकरून तुमचा डेटा पूर्णपणे सुरक्षित राहील.
महत्वाच्या बातम्या :
Smartphone : Realme 10 Pro आणि Realme 9 Pro मधील कोणता स्मार्टफोन बेस्ट आहे? वाचा संपूर्ण माहिती