एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आता ट्वीट एडिट करता येणार!
आता आपण केलेलं ट्वीट एडिट करण्याचा ऑप्शन आपल्याला मिळणार आहे. हे नवीन फिचर लवकरच लॉन्च केलं जाणार आहे. या नव्या फिचरमुळे ट्विटर अधिक युझर फ्रेन्डली होणार आहे.
कॅलिफोर्निया : अनेकदा आपण ट्वीट करताना त्यात चूक करतो, किंवा महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये लिहिणं, अटॅच करणं विसरतो. अशा वेळी आपल्याला जुनं ट्वीट डिलीट करुन नव्याने ट्वीट करावं लागतं. परंतु आता या त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळणार आहे.
आता आपण केलेलं ट्वीट एडिट करण्याचा ऑप्शन आपल्याला मिळणार आहे. हे नवीन फिचर लवकरच लॉन्च केलं जाणार आहे. या नव्या फिचरमुळे ट्विटर अधिक युझर फ्रेन्डली होणार आहे.
ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डोर्से याबाबत म्हणाले की, "आम्ही ट्विटरमध्ये लवकरच 5 ते 30 सेकंदांचं डिले फिचर आणत आहोत. या नव्या फिचरमुळे ट्वीट केल्यानंतर काही वेळात ते एडिट करता येईल. ट्वीट रिएडिट करण्यासाठी ठराविक वेळच दिली जाईल, त्या वेळेत ते रिएडिट करुन घ्यावं, परंतु दिलेल्या वेळेत ट्वीट एडिट केलं नाहीत तर पुन्हा ते एडिट करता येणार नाही."
...म्हणून ट्विटरवर एडिटचा ऑप्शन नाही
ट्विटर हे पूर्णपणे मोबाईलमधल्या एसएमएसच्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. त्यामुळे जसे आपल्याला एसएमएस एडिट करता येत नाहीत, तसेच आपण ट्वीटदेखील एडिट करु शकत नाही.
गेल्या काही वर्षांपासून ट्विटरवरही फेसबुक, इन्स्टाग्रामप्रमाणे एडिटचं फिचर उपलब्ध करून द्या, अशी मागणी ट्विटरकडे मोठ्या प्रमाणात होत आहे. हे फिचर ट्विटरमध्ये आणणे कंपनीसाठी मोठे कठीण काम आहे. या फिचरसाठी ट्विटरला खूप मोठा अंतर्गत बदल करावा लागणार असल्यामुळे या मागणीकडे ट्विटरकडून दूर्लक्ष केले जात होते. परंतु आता त्यावर विचार करुन ट्विटरमध्ये एडिट करण्याचा ऑप्शन आणला जाणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement