Twitter New Feature : 'ट्विटर'वरील शब्द मर्यादा हटणार, आता 280 पेक्षा जास्त कॅरेक्टर ट्वीट करता येणार
Twitter New Feature : आता तुम्ही लवकरच तुम्हांला ट्विटरवर (Twitter) मोठा लेख पोस्ट करता येणार आहे. सध्या ट्विटर या फीचरची चाचणी करत आहे. लवकरच हे फीचर सर्वांसाठी लाँच करण्यात येणार आहे. चला संपूर्ण वैशिष्ट्य समजून घेऊया.
Twitter New Feature : तुम्ही ट्विटरवर (Twitter) सक्रिय असाल आणि आत्तापर्यंत तुम्हाला काहीही ट्विट करताना शब्दमर्यादेमुळे समस्या येत असतील, तर ही एक दिलासादायक बाब आहे. सध्या ट्विटर अशा एका नव्या फीचरवर (Twitter New Feature) काम करत आहे, ज्याद्वारे तुम्ही आता ट्विटरवर मोठे लेख पोस्ट करू शकाल. कंपनीकडून या फिचरची चाचणी सध्या सुरू आहे. लवकरच हे फीचर सर्वांसाठी रिलीझ केले जाईल.
काय आहे नवं फिचर?
रिपोर्टनुसार, मायक्रो-ब्लॉगिंग साईट ट्विटरचे हे फीचर त्याचा सर्वात मोठा अडथळा दूर करेल. कंपनीकडून असे सांगण्यात येत आहे की, या फीचरमध्ये युजर्सना अधिक शब्दांची पोस्ट शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध होईल. याचा अर्थ ट्विटसाठी निश्चित केलेली शब्दमर्यादा हटवली जाणार आहे. म्हणजेच, तुम्ही 280 शब्दांपेक्षा जास्त शब्दांचे ट्विट करू शकाल.
कसं काम करेल नवे फिचर?
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार तुम्हाला हे फीचर ट्विटर आर्टिकलमध्ये उपलब्ध होईल. यामध्ये जाऊन तुम्ही सर्वात मोठा लेखही लिहू शकाल. येथे तुम्हाला कोणत्याही प्रकारची शब्द मर्यादा दिसणार नाही. लेख लिहिल्यानंतर, तुम्हाला पूर्वीप्रमाणेच ट्विटवर क्लिक करावे लागेल.
शर्यतीत टिकण्यासाठी बदल
ट्विटरच्या प्रतिस्पर्धी कंपन्या फेसबुक (Facebook) आणि रेडिट (Reddit) प्लॅटफॉर्मवरती वापरकर्त्यांना कोणत्याही पोस्टसाठी शब्द मर्यादा नाही. यामुळे ट्विटरवर असे फीचर्स देण्यासाठी दबाव होता. याशिवाय आतापर्यंत ट्विटर युजर्सना लांब पोस्टची इमेज किंवा स्क्रीनशॉट बनवून ते अटॅच करून पोस्ट करावे लागत होते. त्यामुळे वापरकर्ते शब्दमर्यादा हटवण्याची मागणी करत होते.
संबंधित बातम्या :
- Jio Prepaid Plan : जियोच्या ग्राहकांना पुन्हा झटका, 'हे' प्रीपेड रिचार्ज प्लान महागले
- Instagram New Feature : आता इंस्टाग्राम स्वत:च तुम्हाला सांगेल - 'ब्रेक नंतर भेटू', Take a Break फीचर भारतात लाँच
- Oppo Reno 7 सिरीज भारतात लाँच, जाणून घ्या याचे खास फीचर्स आणि किंमत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha