एक्स्प्लोर
सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी टिप्स
'तुमच्या खात्यात एक हजार रुपये टाकण्यात आले असून त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.' असा मेसेज अनेक जणांना आला आहे. त्यानंतर हे मेसेज फसवे असून तुमची लूट होण्याची शक्यता वर्तवणारे मेसेजही वायरल होत आहेत. यामागची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न 'एबीपी माझा'ने केला.
मुंबई : चहा-पाण्याचे चिरीमिरी पैसे देतानाही का-कू करणारा तुमचा मित्र अचानक तुमच्या खात्यात हजारभर रुपये पाठवायला लागला तर? विचारानेही आश्चर्याचा धक्का बसला ना? अनोळखी नंबरवरुन तुम्हाला टेक्स्ट मेसेज येतो. तुमच्या 'अमुक-तमुक' मित्राने तुमच्या खात्यात एक हजार रुपयाची रक्कम जमा केली आहे, असं त्यात लिहिलं असतं. मेसेजमध्ये तुम्हाला एक कोड पाठवला जातो आणि अॅप डाऊनलोड करायला सांगतात... मग पुढे काय?
'तुमच्या खात्यात एक हजार रुपये टाकण्यात आले असून त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.' असा मेसेज अनेक जणांना आला आहे. त्यानंतर हे मेसेज फसवे असून तुमची लूट होण्याची शक्यता वर्तवणारे मेसेजही वायरल होत आहेत. यामागची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न 'एबीपी माझा'ने केला.
एखादी कंपनी स्वत:च्या प्रमोशनसाठी अशाप्रकारे मेसेज पाठवत असल्याचं आपल्याला याआधीही दिसून आलं आहे. ज्यात फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, उबेर, मिंत्रा सारख्या अॅपचा समावेश आहे. कित्येकदा या वेबसाईट्सशी साधर्म्य असलेल्या फसव्या लिंकही आपल्याला येतात. अशा लिंक्सवर क्लिक न करता ज्या अॅपचा तुम्ही वापर करत आहात, त्यांना याबाबत माहिती द्या.
त्याचसोबत आपल्या आधारकार्ड, पॅनकार्ड, क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहिती 'सुरक्षित' (Secure) असलेल्या वेबसाईट लिंकशिवाय इतरत्र कुठेही वापरु नका, असाही सल्ला सायबर फॉरेंसिक सल्लागार तन्मय दीक्षित यांनी दिला आहे.
सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी काय काळजी घ्याल?
1) तुम्हाला ज्या अॅपवर मेसेज आला आहे (व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक) तिथे तुम्ही 'रिपोर्ट अब्युज' करु शकता. म्हणजे संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकेल.
2) असे मेसेज येणारे नंबर किंवा ईमेल्सना तुम्ही तुमच्या सेटिंगमधून ब्लॉक करुन सुरक्षित राहू शकता
3) असे मेसेज पाठवणार्या व्यक्तीवर तुम्ही कायदेशीर कारवाई करु शकता. त्याच्यासाठी भारतात सायबर लॉ आहेत.
4) तुमचा वन टाइम पासवर्ड (ओटीपी), अकाऊंटचा पासवर्ड, तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर अशी माहिती मिळवून फसवणूक केली जाते. अशी माहिती सहजासहजी कोणालाही देऊ नये.
5) तुमचा मोबाइल शक्यतो इतरांच्या हाती कधीच देऊ नका. एखादा निष्णात हॅकर काही सेकंदांत मोबाइल हॅक करु शकतो.
6) मोबाइलमध्ये अँटीव्हायरस आणि फायरवॉल सतत सुरु ठेवा. स्कॅन करा आणि रेग्युलर अपडेट करत राहा.
7) प्ले स्टोअरवरुन अॅप डाऊनलोड करताना कोणकोणत्या परमिशन्स दिल्या आहेत, ते चेक करा आणि अनावश्यक असलेल्या सर्व परमिशन्स काढून टाका.
8) जर एखादे अॅप तुम्ही क्वचितच वापरत असाल, तर लागेल तेव्हाच डाऊनलोड करा आणि काम झालं की डिलीट करा.
9) तुमच्या सर्व अकाऊंट्सना सेकंड स्टेप ऑफ व्हेरिफिकेशन, टोकन सिक्युरिटी वापरा आणि अकाऊंटला काही प्रॉब्लेम आल्यास बॅकअप बटण दाबून अकाऊंट पुन्हा सुरु करा.
10) काम झाल्यावर कॉम्प्युटर, मोबाईल, वायफाय, ब्लूटूथ, एनएफसी बंद करा.
11) तुम्ही जेव्हा सार्वजनिक ठिकाणी असाल तेव्हा सोशल नेटवर्क साईट, ईमेल तसेच बँकेचे अकाऊंट कधीही ओपन करु नका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
जालना
मुंबई
Advertisement