एक्स्प्लोर
या फोनच्या किंमतीत तब्बल 13600 रुपयांची कपात
हा स्मार्टफोन भारतात 49 हजार 999 रुपयांच्या किंमतीसह लाँच करण्यात आला होता.
मुंबई : सोनी एक्सपीरिया XZs च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. किंमतीत 13 हजार 600 रुपयांची कपात करण्यात आली असून हा फोन आता 36 हजार 399 रुपयात उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन भारतात 49 हजार 999 रुपयांच्या किंमतीसह लाँच करण्यात आला होता.
सोनी एक्सपीरिया XZs ब्ल्यू, वार्म सिल्व्हर आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध असेल. 19 मेगापिक्सेलचा मोशन आय कॅमेरा हे या फोनचं वैशिष्ट्य आहे. ज्यात 960 फ्रेम/सेकंडच्या वेगाने सुपर स्लो मोशन व्हिडिओ रेकॉर्ड केला जाऊ शकतो. यामध्ये 4K व्हिडिओही रेकॉर्ड केला जाऊ शकतो.
या फोनमध्ये 19 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. शिवाय 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे.
एक्सपीरिया XZs चे फीचर्स
- अँड्रॉईड 7.0 नॉगट
- 5.2 इंच आकाराची स्क्रीन
- 64 बिट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर
- 19 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज
- 2,900 mAh क्षमतेची बॅटरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
रायगड
जळगाव
Advertisement