एक्स्प्लोर
तब्बल 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, सोनीचा नवा फोन लाँच

नवी दिल्लीः सोनीने नवा स्मार्टफोन एक्सपीरिया XA ultra भारतात लाँच केला आहे. या फोनचा कॅमेरा हे सर्वात मोठं आकर्षण आहे. भारतात या फोनची किंमत 29 हजार 990 रुपये असून सोनीच्या स्टोअर्ससोबतच इतर स्टोअर्समध्येही हा फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. सेल्फी प्रेमींसाठी हा फोन पर्वणी आहे. फ्रंट कॅमेराच तब्बल 16 मेगापिक्सल असल्यामुळे सेल्फीप्रेमींची या फोनवर उडी पडणार हे नक्की आहे. कॅमेऱ्यासोबतच या फोनचे इतर फीचर्सही जबरदस्त आहेत. फीचर्सः
- 21 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 6 इंच आकाराची स्क्रीन
- 3 GB रॅम
- 16 GB इंटर्नल स्टोरेज
- अँड्रॉईड 6.0 ऑपरेटिंग सिस्टीम
- 2700mAh क्षमतेची बॅटरी
आणखी वाचा























