एक्स्प्लोर
गूगल सर्चमध्ये सिंधू अव्वल
गुवाहाटी: सध्या सर्च इंजिन गूगलवर रिओ ऑलिम्पिकचा ज्वर पाहायला मिळत आहे. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू सध्या गूगल सर्च इंजिनवर अव्वल स्थानी आहे. याच्यानंतर कांस्य पदक विजेती पैलवान साक्षी मलिक हिचा क्रमांक आहे.
गूगलच्या एका जाहिरातीत म्हणल्यानुसार, बॅडमिंटनच्या महिला एकेरीतील उपांत्य फेरीत जगतिक क्रमवारीतील सहाव्या क्रमांकावर असलेल्या नोजोमी ओकुहाराचा पराभव केल्यानंतर, पीव्ही सिंधू सर्वाधिक सर्च करण्यात आलेली भारतीय खेळाडू आहे. यानंतर भारतासाठी या पर्वातील पहिले पदक जिंकलेल्या साक्षी मलिक या खेळाडूचा क्रमांक आहे.'' गेल्या तीन दिवसांत इंटरनेटवर सर्वाधिक सर्च होणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये किदाम्बी श्रीकांत (बॅडमिंटन), दीपा करमाकर (जिमॅस्टिक), सानिया मिर्जा (टेनिस), सायना नेहवाल (बॅडमिंटन), विनेश फोगाट (कुस्ती), ललिता बाबर ( 3000 मीटर स्टीपलचेस), विकास कृष्ण यादव (मुष्टीयुद्ध) आणि नरसिंह पंचम यादव (कुस्ती) यांचा समावेश आहे. गेल्या सात दिवसांत ऑलिम्पिकनिमित्त जगभरातून सर्च होणाऱ्या देशांमध्ये भारताच्या ११ व्या क्रमांक असल्याचे म्हटले आहे. गूगलच्या सर्चमध्ये परदेशी खेळाडूंमधील जमैकाचा सर्वात जलद धावपटू उसेन बोल्टला सर्वाधिक भारतीयांनी सर्च केले आहे. यामध्ये पूर्वोत्तर राज्यांतील नागरिकांमध्ये रिओ ऑलिम्पिकसाठी अतिशय उत्साही आहेत.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement