एक्स्प्लोर
'स्कूप व्हूप'चा सहसंस्थापक सुपर्ण पांडेंवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

मुंबई : 'टीव्हीएफ'चे सीईओ अरुणभ कुमार आणि 'क्वीन'चा दिग्दर्शक विकास बहल यांच्यावरील लैंगिक अत्याचाराचे आरोप ताजे असतानाच आणखी एक खळबळजनक आरोप होत आहे. 'स्कूपव्हूप' या ऑनलाईन जगतातील सुप्रसिद्ध वेबसाईटचे सहसंस्थापक सुपर्ण पांडे यांच्याविरोधात लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांडेंसोबतच आणखी एका सहसंस्थापक या प्रकरणाला खतपाणी दिल्या आणि पाठीशी घातल्याप्रकरणी अडचणीत येण्याची शक्यता आहे. स्कूपव्हूप मीडिया प्रायव्हेट लिमिटेडमधील एका माजी वरिष्ठ अधिकारी महिलेने दिल्लीच्या वसंत कुंज पोलिसात ही तक्रार दाखल केली आहे.
सुपर्ण पांडेंविरोधात 354 अ (लैंगिक अत्याचार), 506 (धाक दाखवणे) यासारख्या कलमां अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात सुपर्णने असभ्य शेरेबाजी केल्याचा आरोप तक्रारकर्तीने केला आहे. आपल्या लैंगिकतेविषयीही टिप्पणी केल्याचा दावा तिने केला आहे.
'क्वीन'च्या दिग्दर्शकावर लैंगिक अत्याचाराचे आरोप, कंगना म्हणते..
'सुपर्ण पांडेंनी जाहीररित्या माझं नाव घेत माझी लैंगिक आवड-निवड, सेक्शुअल प्रेफरन्स आणि सेक्शुअॅलिटी याविषयी वाच्यता केली.' असं तक्रारकर्तीने एफआयआरमध्ये म्हटलं आहे. फक्त शाब्दिक शेरेबाजीच नाही, तर जवळीकता साधत माझ्या केसांशी खेळल्याचंही तिने म्हटलं आहे. कंपनीच्या अधिकृत जीमेल चॅटमध्ये निर्लज्जपणे असभ्य व्हिडिओ पाठवल्याचा उल्लेखही पीडितेने केला आहे. याची तक्रार दुसऱ्या एका महिला सह-संस्थापकाकडे केली असता, याची पुनरावृत्ती न होण्याचं आश्वासन त्यांनी दिलं, मात्र पांडेंविरोधात कोणतीही कारवाई केली नाही, असं तक्रारकर्तीने म्हटलं आहे. सुपर्ण पांडेंनी सर्व मर्यादांचं उल्लंघन केल्याने आपण नोकरीचा राजीनामा दिल्याचा दावा तक्रारकर्तीने केला आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
