एक्स्प्लोर
ट्विटरवर कांदा उत्पादकांच्या समस्यांचा पाऊस
मुंबई : ट्विटरवर आज राज्यातल्या कांदा उत्पादकांच्या समस्यांचा पाऊसच पडला. #saveonionfarmers या हॅशटॅग च्या नावाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची जोरदार मोहिमच ट्विटरवर सुरु होती.
केंद्र व राज्य सरकारच्या अनास्थामुळं राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सुरू असलेली ससेहोलपट आज ट्विटरनं जगात पोहचवली.
https://twitter.com/supriya_sule/status/774504691610689536
विनोदी अभिनेता कपिल शर्माला ट्वीटमध्ये मेन्शन करुन, 'कपिलभाई, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक ट्वीट कर. सरकारला जाग येईल.' असे ट्वीट कमालीचे फिरत होते.
https://twitter.com/RVikhePatil/status/774482709645291520
यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनीही उडी घेतली. 'मै कपिल तो नही, लेकिन सरकार को अपिल तो करती हूँ...! Save Onion Farmer ..! असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले.
https://twitter.com/dhananjay_munde/status/774492832228904960
यावर देशभरातून प्रतिक्रियांचा पाऊस पडला. तेलंगणातील शेतकऱ्यांनी चक्क कांद्याचे भाव गडगडल्याने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावेच पंतप्रधान मोदी यांना ट्वीट करून कळवली.
https://twitter.com/dhananjay_munde/status/774491672189276160
मुंबईत सर्वच राजिकय पक्ष कपिलच्या ट्विट करून आक्रमक झालेले असताना, मनसेला मात्र कांदा उत्पादकांच्या ट्वीट ट्रेन्डमध्ये रस नसल्याचे पाहून, 'कपिलला सोडा. ज्या नाशिकनं पहिली सत्ता दिली. तिथल्या कांदा उत्पादकांची चिंता करा. असे ट्वीट करून जाग आणण्याचा प्रयत्न केला.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे यांनीही ट्विटरच्या या चर्चेत सहभागी होत सरकारवर टिकेची झोड उठवली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement