एक्स्प्लोर
सॅमसंगने गॅलक्सी नोट 7 चं उत्पादन थांबवलं
मुंबई: जगभरात सॅमसंग गॅलक्सी नोट 7 च्या बॅटरी स्फोटाच्या घटना समोर येत असताना कंपनीने रिप्लेसमेंट ऑफर सुरु करुन बाजारातून जुने गॅलेक्सी नोट 7 मॉडेलचे स्मार्टफोनही परत मागवले. मात्र रिप्लेस केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्येही तोच प्रकार घडत असल्याने कंपनीने याचे उत्पादनच थांबवल्याचे वृत्त दक्षिण कोरियातील यॉनहॅप या वृत्तसंस्थेने दिलं आहे.
गॅलक्सी नोट 7 स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्यानंतर कंपनीने सर्व हँडसेट परत मागवले. यानंतर कंपनीने सप्टेंबर महिन्यापासून रिप्लेसमेंटसाठी एक्सचेंज ऑफर सुरु केली. मात्र, या एक्सचेंज ऑफरमधील नव्या स्मार्टफोनमध्येही स्फोट होण्याच्या घटना समोर येऊ लागल्याने कंपनीने या फोनचं उत्पादनच थांबवलं आहे.
गेल्या आठवड्यातही सिंगापूरहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्समध्ये सॅमसंगच्या गॅलेक्सी नोट 2 ने अचानक पेट घेतला होता. यावेळी केबीन क्रूच्या सतर्कतेने ही आग आटोक्यात आणण्यात आली.
संबंधित बातम्या
इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात गॅलक्सी नोट 2 ला आग
सॅमसंग 'गॅलक्सी नोट 7' स्मार्टफोन बदलून देण्यास सुरुवात
सॅमसंग गॅलक्सी नोट 7 चा खिशात स्फोट, कंपनीवर खटला
सॅमसंग गॅलक्सी नोट 7 वर बाजारात बंदी, अमेरिका सरकारची घोषणा
सॅमसंग गॅलक्सी नोट 7 सह विमान प्रवासाला मनाई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement