(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'सॅमसंग' भारतीयांच्या सर्वात आवडीची कंपनी : सर्व्हे
टीआरएने 16 शहरात केलेल्या सर्व्हेनुसार, सॅमसंग मोबाईल कंपनीनंतर या यादीत दुसऱ्या स्थानावर टाटा मोटर्स आहे. अॅपल या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर मारुती सुझुकी पाचव्या स्थानावर आहे.
नवी दिल्ली : सॅमसंग ही दक्षिण कोरियाची मोबाईल कंपनी भारतीयांच्या आवडीचा कंपनी बनली आहे. टीआरए रिसर्जने याबाबतची माहिती दिली आहे. तर भारतीय टेलिकॉम सेक्टरमध्ये धुमाकूळ घालणारी रिलायन्स जिओ ही कंपनी टॉप-20 ब्रॅन्डमध्ये चौथ्या स्थानावर आहे.
टीआरए रिसर्चचे सीईओ एन चंद्रमौली यांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅमसंग ग्राहकांना विविध किंमतीचे मोबाईल फोन्स पुरवत आहे. ज्यामध्ये 8 हजार रुपयांपासून 75 हजार रुपयांपर्यंच्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. सॅमसंग नोट-7 मुळे कंपनीला काहीसं नुकसान सहन करावं लागलं होतं. मात्र या तोट्यातून सावरुनही कंपनीने ग्राहकांच्या मनातील आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे.
रिलायन्स जिओने इंटरनेट विश्वात मोठी क्रांती केली. जिओने आकर्षक डेटा आणि कॉल प्लान यामुळे आपली पॉप्युलॅरिटी कायम ठेवली असल्याची मत एन चंद्रमौली यांनी व्यक्त केलं आहे.
टीआरएने 16 शहरात केलेल्या सर्व्हेनुसार, सॅमसंग मोबाईल कंपनीनंतर या यादीत दुसऱ्या स्थानावर टाटा मोटर्स आहे. अॅपल या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर मारुती सुझुकी पाचव्या स्थानावर आहे.