एक्स्प्लोर
लॉन्चिंगच्या आधीच नवा सॅमसंग गॅलक्सी A90 लीक, रोटेटिंग पॉप अपसह 48 मेगापिक्सल कॅमेरा
या फोनमध्ये सर्वात महत्वाचं फीचर म्हणजे याचा कॅमेरा. या फोनमध्ये ट्रिपल लेन्स रेअर कॅमेरा दिला जाणार आहे, जो 48 मेगापिक्सलचा असेल. तर 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा सेंसरदेखील यामध्ये असणार आहे.
मुंबई : सॅमसंगचा लेटेस्ट गॅलक्सी A90 हा स्मार्टफोन 10 एप्रिल रोजी लॉन्च करण्याची तयारी सुरु आहे. मात्र लॉन्चिंगच्या आधीच हा स्मार्टफोन लीक झाला आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स आधीच लीक झाले आहेत.
सॅमसंग गॅलक्सी A90 मध्ये ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्याची शक्यता आहे. सोबतच फोनमध्ये नॉच डिस्प्लेची सुविधा दिली जाणार नाही, अशीही माहिती आहे. याबदल्यात या फोनमध्ये पॉप अप रोटेटिंग कॅमेरा मॉड्यूल दिले जाणार आहे, जे फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूंना काम करणार आहे.
या फोनमध्ये सर्वात महत्वाचं फीचर म्हणजे याचा कॅमेरा. या फोनमध्ये ट्रिपल लेन्स रेअर कॅमेरा दिला जाणार आहे, जो 48 मेगापिक्सलचा असेल. तर 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा सेंसरदेखील यामध्ये असणार आहे.
या फोनमध्ये रोटेटिंग पॉप अप कॅमेरा दिला असल्याने युझर्स 48 मेगापिक्सलचा सेल्फी सुद्धा घेऊ शकणार आहे, अशी माहिती आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाई ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा आहे. सॅमसंग गॅलक्सी ए90 मध्ये 6.41 इंचाची स्क्रीन दिली जाणार आहे तर 6 आणि 8 जीबी रॅमसुद्धा दिली जाणार आहे. या फोनमध्ये 128 जीबी इंटरनल मेमरी स्टोअरेज दिले जाऊ शकते. हा फोन येत्या 10 एप्रिल रोजी लॉन्च होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement