एक्स्प्लोर
सॅमसंगच्या या फोनच्या किंमतीत आतापर्यंत सात हजार रुपयांची कपात
हा स्मार्टफोन आता 29 हजार 900 रुपयात भारतामध्ये उपलब्ध होईल. ऑफलाईन किंवा ऑनलाईन अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर हा फोन तुम्ही खरेदी करु शकता.
मुंबई : सॅमसंगचा 6GB रॅम असणारा पहिला स्मार्टफोन C9 प्रोच्या किंमतीत पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन आता 29 हजार 900 रुपयात भारतामध्ये उपलब्ध होईल. ऑफलाईन किंवा ऑनलाईन अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर हा फोन तुम्ही खरेदी करु शकता.
यापूर्वी जून महिन्यातही या फोनच्या किंमतीत कपात करण्यात आली होती. जूनमध्ये या फोनच्या किंमतीत 5 हजार रुपयांची कपात करण्यात आली होती. ज्यामुळे 36 हजार 900 रुपयांचा हा फोन 31 हजार 900 रुपयांमध्ये उपलब्ध होता.
C9 प्रोच्या किंमतीत यावेळी आता 2 हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. ऑफलाईन रिटेलर महेश टेलीकॉमने याबाबतची माहिती दिली आहे.
C9 प्रोचे फीचर्स
- अँड्रॉईड 6.0 मार्शमॅलो
- ड्युअल सिम स्लॉट
- 6 इंच आकाराची स्क्रीन
- ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 653 प्रोसेसर
- 6GB रॅम
- 64GB इंटर्नल स्टोरेज, जे 256GB पर्यंत वाढवता येऊ शकतं
- 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा
- होम बटणसोबत इंटिग्रेटेड फिंगरप्रिंट सेन्सर
- 4000mAh क्षमतेची बॅटरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
रायगड
जळगाव
Advertisement