एक्स्प्लोर
LPG सिलिंडरचे पैसे ऑनलाईन भरा, 5 रुपये सूट मिळवा!
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलनंतर आता एलपीजी गॅस सिलिंडरच्या ऑनलाईन बुकिंग आणि पेमेंटवर ग्राहकांना 5 रुपये सूट मिळणार आहे. आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल या सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी ऑनलाईन बुकिंग आणि पेमेंटवर सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
देशात सध्या 'कॅशलेस सोसायटी'चे वारे वाहत आहेत. कॅशलेस सोसायटी निर्माण करायची असल्यास अर्थात व्यवहारात डिजिटल माध्यमांचा वापर आवश्यक आहे. याच डिजिटल माध्यमांचा वापर वाढावा यासाठी सरकार वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत आहे. याच दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे ऑनलाईन LPG सिलिंडरवर 5 रुपये सूट देण्याची घोषणा.
याआधी सरकारने पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल, डिझेल भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंट केल्यास 0.75 टक्के सूट देण्याची घोषणा केली होती. याच ऑफरला अनुसरुन एलपीजी गॅस सिलिंडरबाबतही घोषणा करण्यात आली.
https://twitter.com/PTI_News/status/816270354070966272
ऑईल कंपन्यांनी याबाबत सांगताना माहिती दिली की, "एलपीजी गॅस सिलिंडर ऑनलाईन बुकदरम्यान त्याची रक्कमही ऑनलाईन माध्यमातून (क्रेडिट-डेबिट कार्ड, नेट बँकिंग इत्यादी) जमा केली, तर त्यावर सिलिंडरच्या मूळ रकमेवर 5 रुपयांची सूट दिली जाईल. शिवाय, होम डिलिव्हरीवेळी ग्राहकांना कॅश मेमो दिला जाईल, त्यावर सूट दिलेल्या रकमेचा उल्लेखही केला जाईल."
सध्या 14.2 किलोच्या सबसिडी एलपीजी सिलिंडरची किंमत 434.71 रुपये आहे, तर याच किलोच्या मात्र सबसिडी नसलेल्या एलपीजी सिलिंडरची किंमत 585 रुपये आहे. 12 सिलिंडरचा कोटा संपल्यानंतर सबसिडी मिळणाऱ्या ग्राहकांनाही सिलिंडर बाजारभावानेच खरेदी कारावा लागतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement