एक्स्प्लोर

650 सीसीचं दमदार इंजिन, रॉयल एनफील्डच्या दोन शानदार बाईक

या बाईक सर्वात आधी युरोपमध्ये लॉन्च केली जाणार आहे. तर 2018 च्या जून-जुलै महिन्यात या बाईक भारतात लॉन्च केली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मिलान : इटलीच्या मिलानमध्ये 7 नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या EICMA मोटार शोमध्ये अखेर रॉयल एनफील्डने दोन दमदार बाईकवरुन पडदा उठवला. या मोटार शोमध्ये रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर आयएनटी 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 ट्विन सादर करण्यात आल्या. पॉवर बाईक क्षेत्रात आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी कंपनीने 650 सीसीचं नवं इंजिन आणलं आहे. या बाईक सर्वात आधी युरोपमध्ये लॉन्च केली जाणार आहे. तर 2018 च्या जून-जुलै महिन्यात या बाईक भारतात लॉन्च केली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दोन्ही बाईकचा लूक अतिशय शानदार आहे. या दोन्ही बाईक पाहून इंटरसेप्टर मार्कची आठवण होते. मात्र दोन्ही बाईकमध्ये फक्त पाच टक्केच समानता आहे. नव्या इंजिनाबाबत रॉयल एनफील्डचे सीईओ सिद्धार्थ लाल यांनी सांगितलं की, "हे दमदार इंजिन 7500 आरपीएमपर्यंत जातं. यामुळे बाईकचा वेग प्रतितास 130 ते 140 किमीपर्यंत सहजरित्या पोहोचू शकतो." Interceptor 650 ची किंमत सुमारे 3 लाख! नव्या रॉयल एनफील्ड Interceptor 650 ची किंमत सुमारे 3 लाख रुपये असू शकते. मात्र प्रतिस्पर्धी हार्ले डेव्हिडसन स्ट्रीट 750 च्या किंमतीपेक्षा ही किंमत अतिशय कमी आहे. हार्ले डेव्हिडसन स्ट्रीट 750 ची किंमत सुमारे 4 लाख रुपये आहे. या दोन्ही बाईकमध्ये फर्स्ट मॉडर्न रॉयल एनफील्ड 650 ट्विन इंजिन आहे. बाईकमध्ये 8 वॉल्व्ह, एअर/ऑईल कूल्ड, 648CC पॅरलल ट्विन इंजिन आहे, जे 47bh आणि 52 Nmचा टॉर्क देतं. Royal-Enfield-Interceptor-INT-650 इंटरसेप्टर INT 650 मध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स नव्या रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर INT 650 मध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स आहे, जे या बाईकसाठी खास तयार करण्यात आलं आहे. या मोटरसायकलचं चेसिस रॉयल एनफील्डच्या UK टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये डेव्हलप केलं आहे. Interceptor INT 650 सादर करताना रॉयल एनफील्डचे सीईओ सिद्धार्थ लाल म्हणाले की, "Interceptor INT 650 ही मोटरसायकर रायडिंगचा शानदार अनुभव देईल." कॉन्टिनेंटल GT 650 मध्ये ABSसह  फ्रंट आणि रिअरमध्ये डिस्क ब्रेक Royal-Enfield-Continental-GT-650 Interceptor INT 650 सोबतच रॉयल एनफील्डने कॉन्टिनेंटल GT 650 ही सादर केली आहे. या बाईकचं इंजिन, चेसिस आणि रनिंग पार्ट्स ट्विनसारखेच आहेत. Interceptor INT 650 प्रमाणेच कॉन्टिनेंटल GT 650 मध्ये ABS सह फ्रंट आणि रिअरमध्ये डिस्क ब्रेक आहेत. रॉयल एनफील्डचे अध्यक्ष रुद्धतेज सिंह यांनी कॉन्टिनेंटल GT आपली आवडती बाईक असल्याचं सांगितलं. “रॉयल एनफील्डच्या पोर्टफोलियोमध्ये GTआयकॉनिक मोटरसायकल आहे. 2013 मध्ये या लॉन्चनंतर कॉन्टिनेंटलने सातत्याने आपली पकड मजूबत केली आहे,” असं सिंह म्हणाले. कॉन्टिनेंटल GT 650, इंटरसेप्टर INT 650 या दोन्ही बाईक अनेक रंग, स्टँडर्ड, रेट्रो कस्टम स्टाईलमध्ये उपलब्ध होतील.

महत्त्वाच्या बातम्या

Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
WhatsApp New Feature: Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू
Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
Embed widget