Royal Enfield Classic 350 बुलेट 11 रंगांसह भारतात लॉन्च; दमदार फिचर्सची पर्वणी
Royal Enfield Classic 350 : रॉयल एनफील्ड क्लासिक 350 बाईक भारतात लॉन्च करण्यात आली आहे. कोरोनाच्या विषाणूचे सावट असल्यानं ही बाईक बराच काळ प्रतिक्षेत होती.
Royal Enfield Classic 350 : गेल्या काही काळापासून भारतात Royal Enfield अर्थात बुलेट बाईकचं क्रेझ पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीनं रॅायल एनफिल्डचे अनेक मॅाडेल एका पाठोपाठ एक लाँच केले आहेत. त्यातच बुलेटप्रेमी रॉयल एनफील्ड क्लासिक 350 च्या मॅाडेलची आतुरतेनं वाट पाहत होते. अखेर ही बाईक काल (बुधवारी) भारतात 11 रंगासह लाँच करण्यात आली. सोबतच अनेक दमदार फिचर्सची पर्वणीही बुलेटप्रमींना मिळणार आहे. क्लासी लूकसह, दमदार इंजिन या बुलेटमध्ये देण्यात आलं आहे. हे नवं मॉडेल J प्लॅटफार्मवर बेस्ड असेल.
Royal Enfield Classic 350 चे खास फिचर्स
Royal Enfield Classic 350 बुलेट सिंगल आणि डबल सीट ऑप्सन्ससह बाजारात सादर करण्यात येणार आहे. या मॅाडेलची रचना ही सध्याच्या मॉडेलसारखीच असेल. यामध्ये क्रोम बेझल्ससह रेट्रो-स्टाईल सर्क्युलर हेडलँप, क्रोम-प्लेटेड एग्जॉस्ट, राउंड-शेप्ड रियर-व्यू मिरर, एक टियरड्रॉप शेप्ड फ्यूल टँक यांचा समावेश आहे. त्यासोबतच नवे टेल-लँप आणि इंडिकेटर्स तसेच उत्तम कशनिंग सीट्स मिळतील.
11 रंगांच्या पर्यायासह भारतात लॉन्च
Royal Enfield Classic 350 बुलेट एक, दोन नव्हे तब्बल 11 रंगांच्या पर्यायात उपलब्ध असणार आहे. यामध्ये क्रोम रेड, क्रोम ब्रॉन्झ, डार्क स्टील्थ ब्लॅक, हॅल्सियन ग्रीन, हॅल्सियन ब्लॅक, हॅल्सियन ग्रे, रेडडिच सेज ग्रीन, डेजर्ट सँड, रेडडिच रेड, डार्क गनमेटल ग्रे आणि मार्श ग्रे कलर्समध्ये उपलब्ध आहे.
असं आहे Royal Enfield Classic 350 चं दमदार इंजिन
नव्या Royal Enfield Classic 350 मध्ये एक नवं 349cc सिंगल-सिलेंडर फ्यूल इंजेक्टेड एयर-अँड ऑयल-कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे. यामध्ये काउंटर-बॅलेंसर असतील. ज्यामुळे बाईकमध्ये पहिल्याच्या तुलनेत कमी वायब्रेशन असेल. नवी क्लासिक 350 बाईक 20.2bhp च्या मक्सीमम पॉवर आणि 27Nm चा टार्क जनरेट करते. यालाच 5-स्पीड गियरबॉक्स जोडण्यात आले आहेत.
या बाईकशी असेल स्पर्धा
Royal Enfield Classic 350 ची स्पर्धा Honda Hness CB350 सोबत असणार आहे. या बाईकमध्ये 348.36cc ची एअर कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे. जे 21bhp ची पावर आणि 30Nm चा टॉर्क जनरेट करतात. हे इंजिन पाच स्पीड गियर बॉक्ससह येतं. या बाईकची किंमत 1.86-1.92 लाख रूपये आहे.