(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Robots With Emotions : 'या' रोबोटला समजतात भावना, चेन्नईतील 13 वर्षीय मुलाचा भन्नाट शोध
Chennai News : तामिळनाडूतील एका 13 वर्षीय मुलानं एक रोबोट बनवला आहे. विशेष म्हणजे या रोबोटला तुमच्या भावना कळतात, तुम्ही आनंदी आहात की दु:खी हे समजतं.
Robot With Emotions : रोबोट (Robot) ही मानवाची संकल्पना आहे. आता मानवाने विविध प्रकारचे रोबोट तयार केले आहेत. जे वेगवेगळ्या कामांमध्ये मदत करतात. याशिवाय हुबेहुब माणसाप्रमाणे दिसणारे रोबोट तयार करण्यात आले आहेत. हे रोबोट माणूस सांगतो ते प्रत्येक काम करतात. मात्र त्यांना माणसाप्रमाणे भावना समजत नाहीत. त्यामुळे माणसाप्रमाणे रोबोट कितीही चोख काम करु लागला तरी, भावनांची पोकळी कायम आहे. पण चेन्नईमधील एका मुलाने भावना समजणारा रोबोट बनवण्याचा दाव केला आहे. तामिळनाडूमध्ये राहणारा 13 वर्षीय प्रतिक याने तुमचं सुख आणि दु:ख समजणारा रोबोट तयार केल्याची सध्या चर्चा आहे.
तुमच्या भावना समजणारा रोबोट
माणूस आणि रोबोटमध्ये बरंच साम्य आहे. दोघांना दोन हात आणि पाय आहेत. दोघेही बुद्धीची कामे करु शकतात, वजन उचलू शकतात. पण या दोघांमध्ये भावनेची पोकळी कायम होती, मात्र ही पोकळीही आता मिटल्याचं दिसत आहे. तामिळनाडूतील 13 वर्षीय मुलाने भावना असणार रोबोट डिझाइन केल्याचा दावा केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार प्रतीक नावाच्या या मुलाने भावना समजणारा रोबो तयार केला असून आपल्या रोबोटचं नाव 'रफी' (Raffi) ठेवलं आहे.
Tamil Nadu | A 13-year-old student, Prateek, has claimed to have designed a robot with emotions, in Chennai
— ANI (@ANI) August 24, 2022
'Raffi', my robot, can answer queries. If you scold him, he won't answer your queries until you're sorry. It can even understand you if you're sad: Prateek (24.08) pic.twitter.com/9YbqGMBXUw
'रफी रोबोटला समजतात भावना'
प्रतीकने सांगितलं की, त्याचा 'रफी' रोबोट त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो, परंतु तुम्ही त्याला ओरडल्यावर जोपर्यंत तुम्ही त्याची माफी मागत नाही तोपर्यंत तो प्रतिसाद देणार नाही. प्रतिकने असा दावा केला की, 'रफी' तुमच्या भावना समजू शकतो. तुम्ही दुःखी असाल तर तो तुमचा चेहरा आणि मन ओळखू शकतो.
भारत तंत्रज्ञानामुळे नवी उंची गाठेल
तंत्रज्ञानाला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या तामिळनाडूच्या या मुलावर नेटिझन्सनी कौतुकाचा वर्षाव केला. काहींनी असेही सुचवले की रोबोटमध्ये चेहरे आणि आवाजांचा डेटा असणं आवश्यक आहे. एका युजरने म्हटलं आहे की, 'भारतात खूप प्रतिभा आहे. पुढील 10 वर्षांमध्ये भारत तंत्रज्ञानामुळे नवी उंची गाठेल. तंत्रज्ञान मुलांना शिकण्याची आणि विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देईल.'