एक्स्प्लोर
या महिन्यात जिओची ऑफर संपणार, पुढं काय?
मुंबई: रिलायन्स जिओच्या अनेक यूर्जसची 'समर सरप्राईज ऑफर' या महिन्यात संपणार आहे. त्यामुळे आता या यूजर्सला लवकरच रिचार्ज करावं लागणार आहे.
नेमकं कसं रिचार्ज करावं आणि कोणता प्लान घ्यावा याबाबत नेमकी माहिती जाणून घ्या.
समर सरप्राइज ऑफर कधी संपणार हे जाणून घ्या :
तुम्ही 303 रुपयांचं शेवटचं रिचार्ज केव्हा केलं होतं. त्या तारखेवर तुमची समर सरप्राइज ऑफर अवलंबून आहे. प्लानची वैधता जाणून घेण्यासाठी यूजरला जिओ अॅप सूट्समधून माय जिओ अॅप ओपन करावं लागेल. यानंतर जिओ नंबरवरुन लॉग इन करावं लागेल. लॉग इन करताच आपल्याला तुम्ही कोणती ऑफर सध्या वापरत आहात आणि त्याची वैधता केव्हापर्यंत आहे हे दिसून येईल. जर आपण एप्रिलमध्ये 303 रुपयांचं रिचार्ज केलं असेल तर लवकरच तुमची ऑफर संपणार आहे. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा रिचार्ज करावं लागेल.
आता काय कराल?
ऑफर संपताच तुम्हाला रिचार्ज करावं लागेल. हे रिचार्ज ऑफरमध्ये नसून साधारण असेल. जर तुम्ही 309 रुपयांचं रिचार्ज केलं तर तुम्हाला दररोज 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉल मिळेल. पण ही ऑफर फक्त 28 दिवसांसाठी असणार आहे. तर धन धना धन ऑफरमध्ये 309 रुपयात 84 दिवसासाठी 84 जीबी डेटा देण्यात येणार आहे. पण समर सरप्राइज ऑफर घेणाऱ्यांना धन धना धन ऑफर घेता येणार नाही. म्हणजे ज्या नंबरवरुन समर सरप्राइज ऑफर घेतली आहे त्या नंबरवर दुसरी ऑफर मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला साधारण टेरिफ रिचार्ज करावं लागेल.
धन धना धन ऑफर यूजर असल्यास?
जर तुम्ही जिओच्या धन धना धन ऑफरचा वापर करत असल्यास तर तुमच्याकडे अजूनही थोडा वेळा आहे.
कारण जिओनं एप्रिल महिन्यात समर सरप्राइज ऑफर लाँच केली होती. ज्यामध्ये 99 रुपयांसोबत 303 रुपयांच्या रिचार्जवर यूजर्सला पुढील तीन महिन्यांपर्यंत फ्री डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळतं. पण ट्रायच्या सल्ल्यानंतर जिओनं आपली समर सरप्राइज ऑफर मागे घेतली होती. पण त्यावेळीच कंपनीनं स्पष्ट केलं होतं की, ज्या यूजर्सनं ही ऑफर घेतली आहे. त्यांना त्याची सेवा मिळेल. यानंतर कंपनीनं धन धना धन ऑफर आणली होती. ज्यामध्ये 309 रुपयात 84 दिवसांसाठी 84 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग देण्यात आल होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement