एक्स्प्लोर
जिओची प्राईम मेंबरशीप घेण्याची मुदत वाढणार?
मुंबई : रिलायन्स जिओची हॅप्पी न्यू ईयर ऑफर 31 मार्चला संपणार आहे. त्यानंतरही कमी पैशात अनलिमिटेड 4G डेटा आणि मोफत व्हॉईस कॉलिंगचा लाभ घ्यायचा असेल, तर रिलायन्स जिओची प्राईम मेंबरशीप घ्यावी लागणार आहे. 31 मार्चपर्यंत ही मेंबरशीप घेता येईल.
दूरसंचार क्षेत्रातील जाणकारांच्या मते, प्राईम मेंबरशीपची मुदत 31 मार्चवरुन 30 एप्रिलपर्यंत वाढवली जाऊ शकते. प्राईम मेंबरशीप ऑफरमध्ये जिओने अपेक्षित ग्राहकांपैकी 50 टक्के ग्राहक मिळवल्याची माहिती आहे. त्यामुळे ही ऑफर आणखी वाढवली जाऊ शकते, असा अंदाज बांधला जात आहे.
जिओने गेल्या महिन्यातच 10 कोटी ग्राहकांचा पल्ला गाठला आहे. त्यानंतर प्राईम मेंबरशीप या नव्या ऑफरची घोषणा करण्यात आली होती.
काय आहे प्राईम मेंबरशीप ऑफर?
99 रुपयांची प्राईम मेंबरशीप घेतल्यानंतर 303 रुपये प्रति महिना दराने ‘हॅप्पी न्यू ईयर’ ऑफरचा लाभ एक वर्षासाठी म्हणजे 1 एप्रिल 2018 पर्यंत घेता येईल. 31 डिसेंबरला ‘वेलकम ऑफर’ संपल्यानंतर 1 जानेवारीपासून ‘हॅप्पी न्यू ईयर’ ही ऑफर लाँच करण्यात आली होती. ‘हॅप्पी न्यू ईयर’ ऑफरनुसार सध्या ग्राहकांना 31 मार्च पर्यंत प्रति दिन 1GB डेटा आणि मोफत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा आहे.
प्राईम मेंबरशीप न घेतल्यास काय होईल?
1 मार्च ते 31 मार्च या काळात प्राईम मेंबरशीपसाठी नोंदणी करता येईल. मात्र मेंबरशीप न घेतल्यास तुमचं जिओ सिम प्रीपेड किंवा पोस्टपेडमध्ये बदलण्यात येईल. त्यानुसार तुम्हाला जिओच्या टेरिफ प्लॅननुसार रिचार्ज करावं लागेल. सप्टेंबर 2016 मध्ये जिओने टेरिफ प्लॅन लाँच केले होते. टेरिफ प्लॅननुसारही व्हॉईस कॉलिंग मोफत असेल, केवळ डेटाचे पैसे मोजावे लागतील.
जिओ प्राईम मेंबरशीप कुणाला घेता येईल?
जिओच्या प्राईम मेंबरशीपचा लाभ सध्याच्या 10 कोटी ग्राहकांना आणि 31 मार्चपर्यंत नवीन कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना मिळेल. यासाठी नोंदणी प्रक्रिया 1 मार्चला सुरु करण्यात येईल, तर 31 मार्च अंतिम तारीख असेल. प्राईम मेंबरशीपसाठी जिओ युझरला 99 रुपये मोजावे लागतील, तर एक वर्षासाठी ही मेंबरशिप असेल.
जिओ प्राईम मेंबरशीप कशी मिळवाल?
प्राईम मेंबरशीप जिओच्या वेबसाईटवर किंवा अॅपवरुन मिळवता येईल. शिवाय जिओ स्टोअरमध्ये जाऊनही मेंबरशिप घेता येईल.
जिओ प्राईम मेंबरशीपचे फायदे
मेंबरशीप घेणाऱ्या ग्राहकांना जिओचे सर्व अॅप एक वर्षासाठी मोफत वापरता येतील. तर जिओच्या सहयोगी कंपन्यांच्या ऑफर्सचाही लाभ घेता येईल, असं अंबानींनी सांगितलं.
मेंबरशीप घेतल्यास 303 रुपये प्रतिमहिना दराने 31 मार्च 2018 पर्यंत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेटा (1GB प्रतिदिन) वापरता येईल. म्हणजेच आता जिओ वापरण्यासाठी प्रतिदिन 10 रुपये खर्च येणार आहे.
संबंधित बातम्या :
जिओ प्राईम मेंबरशिपच्या रजिस्ट्रेशनला सुरुवात, ग्राहकांना काय फायदा?
जिओची प्राईम मेंबरशीप न घेतल्यास काय होईल?
जिओ मार्चनंतर आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत?
रिलायन्स जिओ 1500 रुपयांहून कमी किंमतीचा 4G स्मार्टफोन लॉन्च करणार?
रिलायन्स जिओ इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्येही नंबर वन!
व्हायरल सत्य : 18 जानेवारीनंतर जिओ सिम बंद होणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement