Redmi Note 11 SE लवकरच होणार लॉन्च होईल, फीचर्स झाले लीक
Redmi Note 11SE Launch Date: Xiaomi येत्या काही दिवसांत आपल्या Redmi सीरीजमधून अनेक नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे.
Redmi Note 11SE Launch Date: Xiaomi येत्या काही दिवसांत आपल्या Redmi सीरीजमधून अनेक नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. कंपनी लवकरच Redmi Note 11 SE नावाने आणखी एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्सद्वारे समोर आली आहे. यासोबतच फोनचे अनेक फीचर्सही रिपोर्टमधून समोर आले आहेत. Redmi Note 11 SE मध्ये 5000 mAh बॅटरी दिली जाऊ शकते. यासोबतच फोनमध्ये 33 डब्ल्यू फास्ट चार्जिंगची सुविधाही उपलब्ध होऊ शकते. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनच्या इतर फीचर्सबद्दल.
मिळू शकतात हे फीचर्स
- Redmi Note 11 SE फोनमध्ये 6.43 इंचाचा फुल HD + सुपर AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. याशिवाय फोनमध्ये 1080×2400 पिक्सेलचे रिझोल्यूशन दिले जाऊ शकते. या फोनमध्ये 90 HZ चा रिफ्रेश रेट मिळू शकतो.
- कंपनी Redmi Note 11 SE फोनमध्ये MediaTek Helio G95 octa core प्रोसेसर इन्स्टॉल करू शकते.
- कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर कंपनी Redmi Note 11 SE फोन मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये 64 MP मेन बॅक कॅमेरा, 8 MP दुसरा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, 2 MP तिसरा डेप्थ कॅमेरा आणि 2 MP चौथा मॅक्रो कॅमेरा फ्लॅशलाइटसह दिला जाऊ शकतो.
- फ्रंट कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर Redmi Note 11 SE फोनमध्ये 13 MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
- कंपनी Redmi Note 11 SE फोनमध्ये 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज देऊ शकते.
- Redmi Note 11 SE फोन Android 11 किंवा Android 12 सह लॉन्च केला जाऊ शकतो.
- Redmi Note 11 SE मध्ये 5,000 mAh बॅटरी दिली जाऊ शकते. यासोबतच फोनमध्ये 33 डब्ल्यू फास्ट चार्जिंगची सुविधाही उपलब्ध होऊ शकते.
- Redmi Note 11 SE फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम, 3.5 मिमी जॅक, वाय-फाय आणि ब्लूटूथ 5.1 सारखी सर्व फीचर्स देखील दिले जाऊ शकतात.
दरम्यान, या बातमीत Redmi Note 11 SE चे हे सर्व फीचर्स फक्त मीडिया रिपोर्ट्समध्ये देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे देण्यात आले आहेत. कंपनीने या फोनच्या भारतीय लॉन्चिंगबद्दल किंवा त्याच्या फीचर्सबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.