Poco Smartphone : Poco M4 Pro 2000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची उत्तम संधी; कुठे आणि कसा घ्याल जाणून घ्या
Poco M4 Pro Offer : 6 जीबी रॅमसह फोनमध्ये 128 जीबी इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. त्याची इंटर्नल मेमरी मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते.
Poco M4 Pro Flipcart Offer : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला Poco M4 Pro चा 6 GB रॅम व्हेरिएंट 2000 रूपयांपेक्षा कमी किंमतीत कसा खरेदी करू शकता ते सांगत आहोत. सर्वात आधी या स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल जाणून घ्या. या स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले आहे.
6 जीबी रॅमसह फोनमध्ये 128 जीबी इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. त्याची इंटर्नल मेमरी मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. फोनमध्ये Helio G96 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जे 33 वॅट क्विक चार्जिंग इंटरफेससह येते.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे, तर 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा ड्युअल सिम 4G स्मार्टफोन आहे आणि Google च्या Android 11 वर काम करतो.
फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनची किंमत 14949 रुपये आहे. या फोनवर अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे 750 रुपयांपर्यंतच्या खरेदीवर 10% सूट. याशिवाय UPI व्यवहारांवर 1000 रुपयांची सूट स्वतंत्रपणे दिली जात आहे. 519 रुपये प्रति महिना EMI वर खरेदी करण्याची ऑफर देखील आहे. याशिवाय या फोनवर 13000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. जर तुम्हाला संपूर्ण एक्सचेंज ऑफर मिळाली, तर तुम्ही हा फोन फक्त 1949 रुपयांमध्ये खरेदी करू शकाल. मात्र, तुमच्या जुन्या स्मार्टफोनची किंमत किती आहे, त्याचे मॉडेल कोणते आहे आणि त्या फोनची सध्याची मार्केटची स्थिती यावर एक्सचेंज ऑफर अवलंबून आहे.
महत्वाच्या बातम्या :
- OnePlus Nord CE 2 Lite 5G : अवघ्या 20 हजारांत खरेदी करता येणार ‘वन प्लस’चा नवा स्मार्ट फोन! जाणून घ्या खास फीचर्स...
- Xiaomi 12 Pro : दमदार फीचर्स, 120W फास्ट चार्जिंगसह Xiaomi 12 Pro भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत
- Nokia Smartphone : नोकियाने भारतात लॉन्च केला बजेट फ्रेंडली स्मार्टफोन Nokia G21, जाणून घ्या फीचर्स