एक्स्प्लोर
पॅनिक बटण असेल तरच मोबाईल विक्रीला परवानगी
नवी दिल्ली : मोबाईल फोन हे स्वसंरक्षणाचं साधन करण्याच्या दृष्टीने सरकारने महत्त्वाची पावलं उचलली आहेत. पॅनिक बटण नसलेले मोबाईल विकण्यास पुढच्या वर्षीपासून परवानगी दिली जाणार नाही, असा इशारा सरकारने दिला आहे.
तंत्रज्ञान हे माणसाचं आयुष्य सुखकर करण्यासाठी आहे. त्यामुळे महिला सुरक्षेपेक्षा तंत्रज्ञानाचा दुसरा चांगला वापर काय असू शकेल. 1 जानेवारी 2017 पासून पॅनिक बटणची सुविधा नसलेले मोबाईल फोन विकता येणार नाहीत. इतकंच नाही, 1 जानेवारी 2018 पासून मोबाईलमध्ये इनबिल्ट जीपीएस असावं, असं दूरसंचार मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी सांगितलं.
सामान्य मोबाईल फोनमध्ये कीपॅडवरील 5 किंवा 9 या कीज् चा वापर इमर्जन्सी कॉलसाठी करता येईल, तर स्मार्टफोनमध्ये इमर्जन्सी कॉल बटण प्रेस आणि होल्ड करण्याची सुविधा असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement