एक्स्प्लोर
फेसबुकवर सर्वाधिक 'एंजल प्रिया' भारतातच
फेसबुकने केलेल्या ताज्या पाहणीनुसार भारत, फिलीपाईन्स, इंडोनेशिया यासारख्या विकसनशील देशांमध्ये सर्वाधिक फेक अकाऊण्ट्स असल्याचं आकडेवारीत उघड झालं आहे
मुंबई : 'एंजल प्रिया' किंवा 'पापा की लाडली परी' अशी अकाऊण्ट तुमच्याही फेसबुक फ्रेण्ड लिस्टमध्ये आहेत का? अशी अकाऊण्ट्स बनावट असण्याची शक्यताच जास्त असते. जगभरात थोडीथोडकी नाहीत, तर अशी तब्बल 20 कोटी फेक अकाऊण्ट आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापैकी सर्वाधिक बनावट खाती भारतात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फेसबुकने केलेल्या ताज्या पाहणीनुसार भारत, फिलीपाईन्स, इंडोनेशिया यासारख्या विकसनशील देशांमध्ये सर्वाधिक फेक अकाऊण्ट्स असल्याचं आकडेवारीत उघड झालं आहे. 31 डिसेंबर 2016 पर्यंत फेसबुकवर 1.86 अब्ज यूझर्स (मंथली अॅक्टिव्ह यूझर्स म्हणजेच सक्रिय वापरकर्ते) होते. त्यापैकी सहा टक्के म्हणजे 11.40 कोटी खाती बनावट होती.
2017 या वर्षात एकूण यूझर्स आणि फेक अकाऊण्टमध्येही मोठी वाढ झाली. 31 डिसेंबर 2017 पर्यंत जगभरात 2.13 अब्ज यूझर्स असून त्यामध्ये दहा टक्के अकाऊण्ट्स फेक निघाली आहेत.
फेसबुकच्या प्रसारामध्ये भारत, इंडोनेशिया, फिलीपाईन्स यासारख्या देशांतील नागरिकांनी मोठा हातभार लावला आहे. मात्र विकसित देशांतील नागरिकांच्या तुलनेने खोटी किंवा बनावट खाती चालवण्याची प्रवृत्तीही याच देशांमध्ये अधिक असल्याचं दिसून येतं.
फेकशिवाय डुप्लिकेट अकाऊण्ट्सचाही यामध्ये समावेश आहे. पासवर्ड विसरल्यामुळे, हॅक झाल्यामुळे किंवा बऱ्याच वर्षांनी फेसबुक वापरायला घेत असल्यास यूझर दुसरं खातं उघडण्याची शक्यता असते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement