एक्स्प्लोर

गोधडीचा ऑनलाईन बिझनेस, पुण्यातील मैत्रिणींच्या कल्पनेला फेसबुकवर ‘लाईक’

पुणे : टाकाऊतून टिकाऊची चर्चा कायम इको-फ्रेंडली म्हणून होत असली, तरी महाराष्ट्राच्या घरा-घरांमध्ये टाकाऊतून टिकाऊ आणि फक्त टिकाऊच नाही तर उबदार गोधडी अगदी शेकडो वर्ष शिवली जाते आहे. पण फेसबुकसारख्या आधुनिक माध्यमाचा वापर करुन गोधडीला आंतरराष्ट्रीय मार्केट मिळालंय, असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना? पण पुण्याच्या अर्चना जगताप आणि ऋचा कुलकर्णी या दोघींनी हे शक्य करुन दाखवलं आहे. पुण्याच्या कोंढवा बुद्रुक या शहराजवळ पण तरी आपलं गावपण जपलेल्या गावात महिलांसाठी काय करता येईल याचा विचार करताना अर्चना आणि ऋचा या मैत्रिणींना गोधडीची कल्पना क्लिक झाली. गोधडी ही खरं तर आपल्या घरा-घरात शिवली जाते. कोंढव्यात ही अनेक महिलांच्या रोजच्या आयुष्याचा भाग असलेली गोधडीच त्यांना आर्थिक दृष्ट्या सबल करु शकेल असा विचार करत अर्चना आणि ऋचा कामाला लागल्या. घरोघरी तयार होणारी गोधडी विक्रीसाठी तयार करायची असेल, तर तिचा दर्जा काय हवा, रंग-डिझाईन-पोत काय हवा असा बराच विचार करण्यात आला. मग त्यावर काम करण्यात आलं. महिलांना प्रशिक्षण ही दिलं गेलं आणि त्यातून उभा राहिला क्विल्ट कल्चर हा छोटा ग्रुप. तयार झालेल्या काही गोधड्या बाजारात विकायला पाठवायच्या तर व्यापाऱ्यांना कमिशन देणं आलं आणि म्हणून त्यापेक्षा विनाखर्चिक असलेला फेसबुक पेजचा पर्याय स्वीकारला गेला. फेसबुक पेजनं तर जणू काही कमाल केली. अनिवासी भारतीय आणि गोधडीच्या युनिकनेसनं भारावलेले अनेक फॉरेनर्ससुद्धा गोधडी म्हणजेच क्विल्टच्या प्रेमात पडले. आपल्या घरात वर्षानुवर्षे गोधडी बघितलेली असल्यामुळे तिच्या सांस्कृतिक महत्त्वाचा विचारच न केल्याचं ऋचा म्हणते आणि गोधडीशी तुटलेल्या अनेकांना एकत्र जोडायला आधी स्वतः तिच्याशी कनेक्ट झाल्याचीही कबुली ती देते. विशेष म्हणजे आता न्यूझिलंड, स्पेन, लंडन, अमेरिका अशा अनेक देशांत क्विल्ट पोचली आहे. क्विल्ट पाठोपाठ क्विल्टच्याच रुपानं नटलेल्या बॅग्ज, पर्सेस, लॅपटॉप स्लिव्ह्ज अशाही गोष्टी आता क्विल्ट कल्चर तयार करते. बाजारातली प्रचंड स्पर्धा, पदोपदी द्यावी लागणारी कमिशन्स यांचा विचार करता गोधडीत जीव ओतणाऱ्या महिलांना आर्थिक फायदा नव्हता. पण फेसबुकवरुन विनामूल्य मार्केटिंग झालं आणि कष्टकरी महिलांना पैसे मिळाले आणि त्यांना चार चांगले दिवस आले. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंटरनेट हा आपल्या आयुष्याचा खरं तर अविभाज्य भाग झाला आहे. पण या सगळ्या माध्यमांचा वापर केला तर आपल्या संस्कृती आणि परंपरेचा भाग असलेल्या, शहरी आयुष्यात थोड्या मागे पडत चाललेल्या वस्तू नुसत्याच पुढे येत नाहीत, तर साता-समुद्रापार ही जातात हे अर्चना आणि ऋचाच्या क्विल्ट कल्चरनं सिद्ध केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
Embed widget