एक्स्प्लोर

मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?

या बैठकीत खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील मुद्दे मांडले. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोदींच्या भेटीनंतर कोणकोणत्या मागण्या याची माहिती दिली. 

Bajrang Sonawane: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी भेट घेतली. या खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. जवळपास अर्धा तास ही बैठक झाली. या बैठकीत खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील मुद्दे मांडले. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोदींच्या भेटीनंतर कोणकोणत्या मागण्या याची माहिती दिली. 

सरकारने तातडीने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे

खासदार बजरंग सोनवणे यांनी मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. पावसाळ्याचे अडीच महिने उलटूनही पाऊस न पडल्याने नद्या कोरड्या ठाकल्या आहेत. गोदावरीचा अपवाद वगळता एकाही नदीला पाणी आलेले नाही. पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या संकटसमयी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने तातडीने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी सोनवणे यांनी केली.  तसेच सन 2025-26 चा पीक विमा आणि अतिवृष्टीचे अनुदान अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून लोक रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे थकीत पीक विमा आणि नुकसानभरपाई त्वरित देण्याची मागणी त्यांनी केली.

बजरंग सोनवणेंनी कोणत्या मागण्या केल्या? 

  • प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या सन २०२५–२६ मधील प्रलंबत दाव्यांचे त्वरित पैसे अदा करावेत आणि २०२६–२७ पासून अ‍ॅड-ऑन कव्हर पुन्हा लागू करावे.
  • ऊसतोड कामगरांच्या मुलांसाठी हंगामी/फिरत्या शाळा तसेच स्थानिक रोजगाराची व्यवस्था करावी.
  • कृषी आधारित उद्योग, अन्न प्रक्रिया, MSME आणि कौशल्य विकासाला चालना देऊन रोजगाराच्या संधी वाढवाव्यात.
  • धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाला गती द्यावी आणि प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा.
  • बीडमध्ये मेडिकल कॉलेज व सुपर स्पेशालटी आरोग्य सुविधा तसेच अंबाजोगाईत ५० खाटांचे क्रिटिकल केअर ब्लॉक मंजूर करावे.
  • एफपीओ, कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊस आणि कृषी प्रक्रिया सुविधांचा विस्तार करावा.
  • बीडमधील धार्मिक व पर्यटनस्थळांचा केंद्रीय योजनांच्या माध्यमातून विकास करावा.

'एनडीए'सोबत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष महायुती किंवा एनडीए (NDA) मध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर खासदार सोनवणे यांनी स्पष्ट शब्दांत पडदा टाकला. "आम्ही 100 टक्के नव्हे तर 100 टक्के विरोधी पक्षातच राहणार आहोत," असा दावा त्यांनी केला. विमानात सत्ताधारी नेत्यांशी होणाऱ्या भेटीगाठींवरून विनाकारण संशय व्यक्त केला जात असल्याचे सांगत ते म्हणाले, "प्रवासादरम्यान योगायोगाने भेटी होणे स्वाभाविक आहे. यापूर्वीही विरोधी पक्षाचे नेते लोकहितार्थ सत्ताधाऱ्यांना भेटत होते. परंतु, अशा भेटींचा राजकीय अर्थ काढणे योग्य नाही." पक्षाची भूमिका ठाम असून आपण विरोधी पक्षाच्या बाकावरच बसून जनतेचे प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संसदेचे कामकाज ठप्प होण्यास सत्ताधारीच जबाबदार

संसदेचे कामकाज सुरळीत चालवणे ही सत्ताधारी पक्षाची प्राथमिक जबाबदारी असते, असे मत खासदार सोनवणे यांनी मांडले. सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांची बैठक बोलावून चर्चा करणे आवश्यक असते. परंतु, सरकार विरोधकांशी संवादच साधत नसेल तर मार्ग कसा निघणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सत्ताधाऱ्यांच्या या आडमुठ्या भूमिकेमुळेच सभागृह चालत नसून याला पूर्णपणे सरकारच जबाबदार आहे. विरोधी पक्ष आणि इंडिया (INDIA) आघाडी जो काही निर्णय घेईल, त्याच्यासोबत आपला पक्ष पूर्ण ताकदीने उभा राहील, असेही त्यांनी नमूद केले.

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Navneet Rana: 'पुराने पेडो का मजाक उडा रहे थे नये पौधे...'; 24 तासांत नवनीत राणांचं दुसरं स्टेटस चर्चेत, रवी राणा-भाजप वादानंतर नेमका रोख कुणाकडे?
'पुराने पेडो का मजाक उडा रहे थे नये पौधे...'; 24 तासांत नवनीत राणांचं दुसरं स्टेटस चर्चेत, रवी राणा-भाजप वादानंतर नेमका रोख कुणाकडे?
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Embed widget