Honda च्या 'या' कार्सवर जूनमध्ये मिळणार भरघोस सूट, पाहा कोणत्या कारवर किती सूट?
रोख सवलतीव्यतिरिक्त, कंपनी आपल्या बऱ्याच मॉडेल्सवर एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काऊंटसारखे फायदे देत आहे. होंडाच्या कोणत्या मॉडेलवर किती सूट दिली जात आहे ते पाहूया.
Auto News : कोरोना साथीच्या दुसर्या लाटेत ऑटो उद्योगासाठी मागील महिना खूप निराशाजनक होता. मे 2021 मध्ये बर्याच कंपन्यांच्या विक्रीत घट झाली आहे. त्याच वेळी आता कंपन्यांना जूनमध्ये त्यांच्या कारवर सूट देऊन विक्री वाढवायची आहे. दरम्यान, होंडा कार्स इंडिया लिमिटेड या महिन्यात निवडक कार्सवर उत्तम ऑफर देत आहे. रोख सवलतीव्यतिरिक्त, कंपनी आपल्या बऱ्याच मॉडेल्सवर एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काऊंटसारखे फायदे देत आहे. होंडाच्या कोणत्या मॉडेलवर किती सूट दिली जात आहे ते पाहूया.
Honada Amaze S MT Petrol
होंडा अमेझच्या Honada Amaze S MT Petrol या कारवर जून 2021 मध्ये 15,000 रुपयांची कॅश डिस्काऊंट दिली जात आहे. त्याचबरोबर कंपनी यावर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसही देत आहे. याबरोबरच तुम्हाला 4000 रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काऊंटचा लाभही मिळू शकेल.
Honada Amaze V MT Petrol
होंडाच्या Honada Amaze V MT Petrol या कारवर कंपनी 5000 रुपयांचा कॅश डिस्काऊंट देत आहे. याशिवाय 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनसदेखील मिळवू शकता. Honada Amaze VX MT Petrol कारवरही कंपनी अशीच ऑफर देत आहे.
Honda WR-V
जूनमध्ये Honda WR-V खरेदी करणे फायदेशीर व्यवहार देखील होऊ शकतो. या महिन्यात Honda WR-V या कारवर 10,000 रुपयांची रोख सूट दिली जात आहे. यासह कंपनी या कारवर 4000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनसही देत आहे.
Honda Jazz
जूनमध्ये Honda jazz च्या खरेदीवर 10,000 रोख बोनस दिला जात आहे. इतकेच नाही तर 10,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनसशिवाय तुम्हाला या कारवर 4,000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनसही मिळू शकेल.
Maruti Suzuki कार्सवरही सवलत
होंडाशिवाय या महिन्यात मारुती सुझुकी कारवरही सूट देण्यात येत आहे. कंपनीच्या सर्वात स्वस्त कार ऑल्टोला या महिन्याच्या खरेदीवर सुमारे 39000 रुपयांचा फायदा मिळत आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्या बर्याच मॉडेल्सवर सूट दिली जात आहे. या महिन्यात कार खरेदी करणे फायदेशीर सिद्ध होऊ शकते.