Twitter News: ब्लू टिकसाठी $8 आकारल्याने युजर्स प्रचंड संतापले, मस्कचेही प्रत्युत्तर
Twitter News: ट्विटरवर ब्लू टिक्ससाठी दरमहा $ 8 भरणे अनिवार्य केले, तेव्हापासून, सोशल मीडियावर (Social Media) यूजर्सकडून विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
Twitter News : एलॉन मस्कने (Elon Musk) ट्विटर (Twitter) विकत घेतल्यानंतर ब्लू टिक्ससाठी दरमहा $ 8 भरणे अनिवार्य केले, तेव्हापासून, सोशल मीडियावर (Social Media) यूजर्सकडून विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. मस्कच्या या निर्णयावर बहुतांश युजर्सनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून ट्विटरच्या ब्लू टिकच्या कमाईला विरोध केला आहे. भारतातही याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. आता काही सरकारी संस्थाही विरोधात येताना दिसत आहेत. मात्र, ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनीही ट्विटरवर या प्रतिक्रियांवर आपली प्रतिक्रिया पोस्ट केली आहे, आपला मुद्दा स्पष्टपणे मांडला आहे.
गेल्या एका आठवड्यात ट्विटरमध्ये खळबळ
एलॉन मस्क हे ट्विटरचे नवीन मालक आहेत आणि त्यांच्या आगमनानंतर ट्विटरमध्ये बरेच काही बदलले आहे. अकाउंट वेरिफिक्शन, ब्लू टिक्स आणि कर्मचार्यांची काढून टाकणे. गेल्या एका आठवड्यात ट्विटरवर खळबळ उडाली आहे. एलॉन मस्कने आता ब्लू टिकसाठी सबस्क्रिप्शन मॉडेल देखील सुरू केले आहे. भारतातही ट्विटरची सशुल्क सेवा महिनाभरात सुरू होऊ शकते. एलॉन मस्क यांनी हे सूचित केले आहे.
युजर्सनी केले प्रश्न उपस्थित
भारतातील नॅशनल क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले, एलॉन मस्क यांनी माझ्या अधिकृत ट्विटर पेजवरून ब्लू टिक काढून टाकावे, परंतु आमच्या संस्थेद्वारे मस्क किंवा त्यांच्या कंपनी ट्विटरसाठी कोणतीही रक्कम दिली जाणार नाही.
Blue Lay's >>>>> Blue Tick https://t.co/qsEN7N2XYr pic.twitter.com/v5Fs28HlpL
— Blinkit (@letsblinkit) November 3, 2022
काश्मीर फाइल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी लिहिले, जर कोणाला दिल्लीत पुढील निवडणूक जिंकायची असेल तर त्याने दिल्लीतील लोकांना मोफत ब्लूटिक्स देण्याचे वचन दिले पाहिजे. तो 100% फरकाने जिंकू शकतो.
OMG! Elon Musk @elonmusk will sell a blue tick badge for $8 /month. I thought he was a human rights defender and free speech activist. But at the end of the day, he is just a clever businessman.
— taslima nasreen (@taslimanasreen) November 2, 2022
सुप्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनीही या विषयावर आपल्या प्रतिक्रियेत लिहिलं आहे - अरे देवा! एलॉन मस्क $8/महिन्याला ब्लू टिक विकेल. मला वाटले की ते मानवाधिकार रक्षक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य कार्यकर्ते आहेत. पण शेवटी तो फक्त एक हुशार व्यापारी ठरला.
you get what you pay for
— Elon Musk (@elonmusk) November 2, 2022
एलॉन मस्कने युजर्सना दिले उत्तर
युजर्सच्या अशा प्रतिक्रियेवर इलॉन मस्कने आपल्या प्रतिक्रियेत लिहिले की, तुम्ही जे पैसे द्याल ते तुम्हाला मिळते. मस्कने पुन्हा म्हटले आहे की, तुम्ही माझ्यावर कितीही टीका केली तरी ब्लू टिकसाठी तुम्हाला 8 डॉलर मोजावे लागतील. त्यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझ्या या निर्णयावर सर्व बाजूंनी माझ्यावर होत असलेला हल्ला हे चांगले आहे. तसेच ट्विटर हे इंटरनेटवरील सर्वात मनोरंजक प्लॅटफॉर्म आहे, म्हणूनच तुम्ही हे ट्विट सध्या वाचत आहात, तुम्ही पैसे न देता ट्विटर वापरू शकता, पण तुम्हाला त्या सुविधा मिळणार नाहीत, असे मस्क यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
Viral Video : पूलाखाली गरीब मुलांना शिकवताना दिसली मुलगी, नेटकरी म्हणाले- 'ही साक्षात सरस्वती!' मन जिंकतोय व्हिडीओ