एक्स्प्लोर
खास ऑफर्ससह मोटो Z2 प्ले भारतात लाँच
नवी दिल्ली : लेनोव्होने मोटोरोलाचा नवा Z सीरिज स्मार्टफोन मोटो Z2 प्ले भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत भारतात 27 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे.
या फोनमध्ये जेबीएल साऊंड बूस्ट, मोटो टर्बोपावर, मोटो गेमपॅड अशा अनेक आकर्षक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी 8 ते 14 जून पर्यंत प्री बूकिंग करता येईल.
मोटोची लाँचिंग ऑफर
मोटो Z2 प्ले कंपनीने काही नवीन ऑफर्ससोबत लाँच केला आहे. हा फोन खरेदी केल्यास यासोबत रिलायन्स जिओचा 100 GB 4G डेटा मोफत मिळणार आहे.
'मोटो Z2 प्ले'ची फीचर्स :
- 5 इंच आकाराची स्क्रीन
- 32 आणि 64 GB स्टोरेज असे दोन व्हर्जन
- 2 आणि 4 GB रॅम व्हर्जन
- 7.1 अँड्रॉईड नॉगट सिस्टम
- ओक्टा कोअर स्नॅपड्रॅगन 626 प्रोसेसर
- 12 मेगापिक्सल रिअर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
- 3000 mAh क्षमतेची बॅटरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement