एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रतीक्षा संपली! Moto G5S Plus चा लाँचिंग मुहूर्त ठरला
हा फोन काही दिवसांपूर्वीच लाँच केलेल्या मोटो G5 प्लस या फोनचं अपडेटेड व्हर्जन आहे.
मुंबई : लेनोव्होने काही दिवसांपूर्वीच मोटो G5S आणि मोटो G5S प्लस हे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. भारतात या दोन्ही स्मार्टफोनची मोठी प्रतीक्षा होती. मात्र आता मोटो G5S प्लस भारतात लाँच करण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे.
मोटो G5S प्लस भारतात 29 ऑगस्टला दुपारी 12 वाजता लाँच केला जाणार आहे. अमेझॉननने या फोनविषयी माहिती शेअर केली आहे. युरोपमध्ये या फोनची किंमत 22 हजार 700 रुपये ठेवण्यात आली होती.
या फोनची विक्री कधीपासून सुरु होईल, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भारतात या फोनची किंमत 19 हजार रुपये असणार आहे. हा फोन काही दिवसांपूर्वीच लाँच केलेल्या मोटो G5 प्लस या फोनचं अपडेटेड व्हर्जन आहे.
मोटो G5S प्लस चे फीचर्स :
- अँड्रॉईड 7.1 नॉगट
- 5.5 इंच आकाराची स्क्रीन
- 3GB आणि 4GB रॅम व्हेरिएंट
- 32GB आणि 64GB इंटर्नल स्टोरेज
- 2.0GHz ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर
- 13 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे (ड्युअल रिअर कॅमेरा)
- 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 3000mAh क्षमतेची बॅटरी
- ऑटो एचडीआर, व्हिडिओ स्टेबिलायझेशन, स्लो मोशन व्हिडिओ, 4K अल्ट्रा एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
Advertisement