एक्स्प्लोर
Advertisement
मोटो जी5, जी5 प्लस लाँच, 15 मार्चपर्यंत भारतात येणार!
मुंबई: मोटोरोलानं मोटो जी5 आणि मोटो जी5 प्लस स्मार्टफोन लाँच केले आहेत. मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2017 (MWC) मध्ये हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. या स्मार्टफोनच्या डिझाइनमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. 15 मार्चपर्यंत हे स्मार्टफोन भारतात येण्याची शक्यता आहे.
मोटो जी 5 आणि मोटो जी5 प्लस स्मार्टफोनचे फीचर्स:
- दोन्ही स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंटमध्ये सेन्सर असणार आहे.
- मोटो जी सीरीजच्या 5व्या व्हर्जनचे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉईड 7.0 नोगट ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असणार आहे.
- मोटो जी5 मध्ये 5 इंच स्क्रीन असणार आहे. तर मोटो जी5 प्लसमध्ये 5.2 इंच स्क्रीन असणार आहे.
- दोन्ही मोबाइलमध्ये स्क्रिन फूल एचडी असून याचं रेझ्युलेशन 1080x1920 पिक्सल असणार आहे.
- मोटो जी5 मध्ये 1.4Ghz Snapdragon 430 प्रोसेसर आहे तर मोटो जी5 प्लसमध्ये 2Ghz Snapdragon 625 ऑक्टा-कोर प्रोसेसर असणार आहे.
- मोटो जी5मध्ये 2 जीबी आणि 3 जीबी व्हेरिएंट आहेत तर मोटो जी5 प्लसमध्ये 2 जीबी, 3 जीबी आणि 4 जीबी व्हेरिएंट असणार आहेत.
- मोटो जी5मध्ये इंटरनल मेमरी 16 किंवा 32 जीबी असणार आहे. तसेच एसडी कार्डद्वारे 128 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते.
- मोटो जी5 प्लसमध्ये इंटरनल मेमरी 32 आणि 64 जीबी असणार आहे. तर एसडी कार्डद्वारे 128 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येईल.
- या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असणार आहे.
- मोटो जी5मध्ये 2800mAh बॅटरी असणार आहे. तर जी5 प्लसमध्ये 3000mAh बॅटरी असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
जळगाव
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement