एक्स्प्लोर
मोटोरोलाकडून बंपर डिस्काऊंट, 'G5s' वर तब्बल 5,000 रुपयांची सूट
मोटोरोलाने ट्वीट करुनही यासंदर्भात माहिती दिली. मोटोरोलाची ही ऑफर 11 एप्रिलपर्यंत असणार आहे. अमेझॉन इंडियावरुन ‘मोटो G5s’ खरेदी केल्यास 5 हजार रुपयांची सूट मिळणार आहे.
नवी दिल्ली : आपल्या 45 व्या वर्धापन दिनानिमित्त मोटोरोला कंपनीने भारतीय स्मार्टफोन युजर्ससाठी खास ऑफर दिली आहे. G सीरीजच्या ‘मोटो G5s’ या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट देण्यात आला आहे. या ऑफरनुसार ‘मोटो G5s’ स्मार्टफोनचा 4 जीबी व्हेरिएंट आता 9 हजार 999 रुपयात खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 14 हजार 999 रुपये आहे.
मोटोरोलाने ट्वीट करुनही यासंदर्भात माहिती दिली. मोटोरोलाची ही ऑफर 11 एप्रिलपर्यंत असणार आहे. अमेझॉन इंडियावरुन ‘मोटो G5s’ खरेदी केल्यास 5 हजार रुपयांची सूट मिळणार आहे.
‘मोटो G5s’ स्मार्टफोन फीचर्स :
या स्मार्टफोनमध्ये सर्वात आकर्षक बाब म्हणजे ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. तसेच, 5.2 इंचाचा स्क्रीन (1080x1920 रिझॉल्युशन पिक्सेल), ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर, 4 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेज आणि अँड्रॉईड नॉगट 7.1 ओएस इत्यादी फीचर्स या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहेत.
या स्मार्टफोनचा कॅमेरा जबरदस्त आहे. 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहेत. 3000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून, स्मार्टफोनसोबत टर्बो चार्जरही देण्यात येते. केवळ 15 मिनिटं जरी चार्जिंक केल्यास किमान 6 तास स्मार्टफोन सुरु राहू शकतो.We don’t mean to brag but making the first phone call 45 years ago calls for some celebration! So head to @AmazonIn and grab the all-metal #MotoG5s, which comes with 4 GB RAM and a 16MP rear camera, now at just Rs. 9,999. Offer valid till 11/04 only.
— Motorola India (@motorolaindia) April 9, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement