एक्स्प्लोर
KUV100 Trip : महिंद्राची पहिली सीएनजी कार, किंमत 5.16 लाख!
ही कार प्रेट्रोल आणि सीएनजी दोन्हीतही उपलब्ध आहे. याशिवाय डिझेल इंजिनचा पर्यायही आहे.
![KUV100 Trip : महिंद्राची पहिली सीएनजी कार, किंमत 5.16 लाख! Mahindra KUV100 Trip Launched With CNG; Priced At Rs. 5.16 lakh KUV100 Trip : महिंद्राची पहिली सीएनजी कार, किंमत 5.16 लाख!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/13120613/Mahindra-KUV1OO-3-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: महिंद्रा आणि महिंद्राने आपली लोकप्रिय केयूव्ही 100 चं नवं व्हर्जन KUV100 Trip लाँच केलं आहे. मध्यमवर्ग आणि व्यावसायिकांना लक्षात घेऊन, या कारची रचना करण्यात आली आहे.
महत्त्वाचं म्हणजे ही कार प्रेट्रोल आणि सीएनजी दोन्हीतही उपलब्ध आहे. याशिवाय डिझेल इंजिनचा पर्यायही आहे.
KUV100 Trip च्या सीएनजी मॉडेलची किंमत 5.16 लाख रुपये आहे, तर डिझेल कारची किंमत 5.42 लाख रुपये आहे.
महिंद्राच्या KUV100 Trip कारमध्ये 6 लोक बसू शकतात.
कंपनीने या गाडीवर फायनान्स स्कीम, अक्सेसरीज आणि पाच वर्षांची वॉरंटी दिली आहे.
KUV100 Trip पहिल्यांदाच सीएनजीच्या पर्यायासह तयार करण्यात आली आहे. ही गाडी दोन रंगात उपलब्ध आहे. डायमंड व्हाईट आणि डॅझलिंग सिल्ह्वर या दोन रंगात ही गाडी मिळेल.
महिंद्राच्या KUV100 Trip या कारला मारुती इग्निसचं आव्हान असेल. या गाडीचं सुरुवातीची शोरुम किंमत 4.59 लाख रुपये.
अधिक माहितीसाठी शोरुम किंवा कंपनीच्या वेबसाईटवर संपर्क साधा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सातारा
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)