एक्स्प्लोर
किंमत 3333, भारतातील पहिला 4G VoLTE फीचर फोन लाँच
मुंबई : लाव्हाने भारतातला पहिला 4G VoLTE फीचर फोन लाँच केला आहे. 4G कनेक्ट M1 असं या फोनचं नाव असून याची किंमत 3 हजार 333 रुपये ठेवण्यात आली आहे. येत्या काही आठवड्यातच हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल, असं कंपनीने म्हटलं आहे.
4G कनेक्ट M1 हा भारतातील पहिलाच 4G VoLTE फीचर फोन आहे. देशात 4G सेवेची लोकप्रियता पाहता हा फोन बाजारत आणला असल्याचं कंपनीने सांगितलं. रिलायन्स जिओच्या मोफत सेवेनंतर 4G युझर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
4G कनेक्ट M1 मध्ये 2.4 इंच आकाराची स्क्रिन, 1.2GHz क्वाड कोअर प्रोसेसर, 512 MB रॅम, 4GB इंटर्नल स्टोरेज, व्हीजीए कॅमेरा असे फीचर्स देण्यात आले आहेत. तर बॅटरी 1750mAh क्षमतेची आहे.
4G ही या फोनची विशेषता आहे. कारण एवढ्या कमी किंमतीतील हा आतापर्यंतचा पहिलाच 4G VoLTE फीचर फोन आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement