एक्स्प्लोर
आयफोनची बॅटरी सवलतीच्या दरात बदलण्याची आज शेवटची संधी
अॅपलकडून काही दिवसांपूर्वी जगभरातील युजर्ससाठी बॅटरीच्या किंमती कमी करण्यात आल्या होत्या. 31 डिसेंबर 2018 पर्यंत ही ऑफर मर्यादित होती.

आयफोन युजर्सना आपल्या मोबाईल फोनची बॅटरी बदलण्याची आज शेवटची संधी आहे. अॅपलकडून काही दिवसांपूर्वी जगभरातील युजर्ससाठी बॅटरीच्या किंमती कमी करण्यात आल्या होत्या. 31 डिसेंबर 2018 पर्यंत ही ऑफर मर्यादित होती. आयफोनच्या जुन्या मॉडेलमधील बॅटरीमुळे मोबाईलच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे हे लक्षात आल्यानंतर अॅपलकडून बॅटरी बदलण्यासाठी युजर्सना आवाहन करण्यात आले होते. तसेच बॅटरीच्या किंमतीवरही मोठ्या प्रमाणात सुट देण्यात आली होती. आयओएसच्या नव्या अपडेटनंतर नव्या ओएस मधील 'पॉवर मॅनेजमेंट फिचर'मुळे मोबाईलचा स्पीड कमी झाल्याच्या तक्रारी वापरकर्त्यांकडून येत होत्या. त्यामुळे अॅपलकडून हा निर्णय घेण्यात आला होता. भारतात 2000 रुपये भरुन आयफोनच्या जुन्या मॉडेल्सची बॅटरी बदलता येणार आहे. 31 डिसेंबरला आज ही ऑफर संपल्यानंतर बॅटरी मुळ किंमतीला म्हणजे जवळपास 6000 रुपयांना मिळणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
छत्रपती संभाजी नगर























