(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kaynes Technology IPO : केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड आयपीओसाठी सज्ज, कंपनी आणि ऑफरविषयी येथे आहे संपूर्ण माहिती
Kaynes Technology : ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार आयपीओमध्ये 650 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू शेअरहोल्डर्स यांच्याकडून 7.2 कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल यांचा समावेश आहे.
Kaynes Technology IPO : केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड (KTIL), एक एंड-टू-एंड आणि IoT सोल्यूशन्स सक्षम इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग प्लेयर, या कंपनीने प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) द्वारे निधी उभारण्यासाठी भांडवली बाजार नियामक सेबीकडे प्राथमिक कागदपत्रे दाखल केली आहेत. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार आयपीओमध्ये 650 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू आणि प्रवर्तक आणि विद्यमान शेअरहोल्डर्स यांच्याकडून 7.2 कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) यांचा समावेश आहे.
ऑफर फॉर सेल कशी?
ऑफर फॉर सेल मध्ये प्रवर्तक रमेश कुन्हीकन्ननच्या 37 लाख इक्विटी समभागांची विक्री आणि विद्यमान शेअरहोल्डर्स फ्रेनी फिरोज इराणीच्या 35 लाखांपर्यंत शेअर्सची विक्री केली जाणार आहे. या ऑफरमध्ये पात्र कर्मचार्यांच्या वर्गणीसाठी 1.5 कोटी रुपयांपर्यंतचे आरक्षण देखील समाविष्ट आहे.
कंपनी राईट्स इश्यू, प्रायव्हेट प्लेसमेंट, प्रेफरन्शियल ऑफर किंवा 130 कोटी रुपयांपर्यंतच्या इतर कोणत्याही पद्धतीसह इक्विटी शेअर्सच्या पुढील इश्यूचा विचार करू शकते. असे प्लेसमेंट पूर्ण झाल्यास, फ्रेश इश्यूचा आकार कमी केला जाईल.
निधीचा वापर कुठे?
130 कोटी रुपयांच्या फ्रेश इश्यूमधून मिळालेली रक्कम कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरली जाईल आणि 98.93 कोटी रुपये म्हैसूर आणि मानेसर येथील उत्पादन सुविधांसाठी भांडवली खर्चाच्या निधीसाठी वापरले जातील.
त्याचप्रमाणे कंपनीने कर्नाटकातील चामराजनगर येथे नवीन सुविधा उभारण्यासाठी कंपनी केन्स इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी रु. 149.30 कोटी वापरण्याची योजना आखली आहे. खेळत्या भांडवलाची गरज आणि सामान्य कॉर्पोरेट प्रस्तावांना निधी देण्यासाठी 114.74 कोटी वापरेल.
कंपनी बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या
म्हैसूर-आधारित केनेस टेक्नॉलॉजी ही एक अग्रगण्य एंड-टू-एंड आणि IoT (इंटरनेट ऑफ थिंग्ज) सोल्यूशन्स सक्षम इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग प्लेयर आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम डिझाइन आणि उत्पादन सेवांच्या संपूर्ण स्पेक्ट्रममध्ये क्षमता आहेत.
ऑटोमोटिव्ह, औद्योगिक, एरोस्पेस आणि संरक्षण, बाह्य-अंतराळ, आण्विक, वैद्यकीय, रेल्वे, इंटरनेट ऑफ थिंग्ज, माहिती तंत्रज्ञान (आयटी) या क्षेत्रातील प्रमुख खेळाडूंसाठी संकल्पनात्मक डिझाइन, प्रक्रिया अभियांत्रिकी, एकात्मिक उत्पादन आणि जीवन-चक्र समर्थन प्रदान करण्याचा अनुभव आहे.
कंपनीचे कर्नाटक, हरियाणा, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आणि उत्तराखंड या राज्यात आठ उत्पादन प्रकल्प आहेत. डिसेंबर 2021 पर्यंत त्याची एकूण क्षमता अंदाजे 600 दशलक्ष घटकांची आहे.
FY21 साठी, कंपनीने मागील आर्थिक वर्षात 368.24 कोटी रुपयांच्या तुलनेत 420.63 कोटी रुपयांची कमाई केली. समीक्षाधीन कालावधीसाठी निव्वळ नफा मागील आर्थिक वर्षातील 9.35 कोटी रुपयांच्या तुलनेत 9.73 कोटी रुपये होता.
महत्वाच्या बातम्या :