एक्स्प्लोर
जिओच्या एअरटेल, वोडाफोन आणि आयडियाला व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा
नवी दिल्ली: रिलायन्स जिओने आपल्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्धी कंपनी एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया यांना व्हॅलेंटाईन डेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. रिलायन्स जिओने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन शुभेच्छा संदेश पोस्ट केला आहे.
रिलायन्स जिओ बाजारपेठेत उतरल्यापासून एअरटेल, वोडाफोन आणि आयडियासोबत प्राईस वॉर सुरु आहे. अशातच जिओने शुभेच्छा संदेश देणारे ट्वीट करुन एकच धक्का दिला आहे.
पण जिओच्या या ट्विटला इतर कोणत्याही कंपनीने प्रतिसाद दिलेला नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जिओ आणि इतर कंपन्यांमध्ये इंटर कनेक्टिव्हीटी पॉईंटस् वरुनही वाद सुरु आहे. इंटर कनेक्टिव्हीटीच्या मुद्द्यावरुन रिलायन्स जिओने टेलिकॉम रेग्यूलेटरी अॅथोरिटी ऑफ इंडिया(ट्राय)कडे धाव घेत गेल्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये तक्रार दाखल केली होती. याची दखल घेत ट्रायने एअरटेल, आयडिया आणि वोडाफोन कंपनींना 3150 कोटींचा दंड ठोठावला होता. संबंधित बातम्या ट्रायने ठोठावला एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोनला 3150 कोटींचा दंडDear @airtelindia, @VodafoneIN, @ideacellular, Happy Valentine’s Day. #WithLoveFromJio
— Reliance Jio (@reliancejio) February 14, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement