एक्स्प्लोर
खुशखबर! जिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅपचं स्पेशल व्हर्जन चालणार?
जिओ फोन हा सर्वात स्वस्त 4G फोन आहे. शून्य रुपये किंमतीचा हा फोन 1500 रुपये अनामत रक्कम ठेवून खरेदी करता येईल. 24 ऑगस्टपासून या फोनसाठी बुकिंग सुरु होणार आहे.
मुंबई : रिलायन्सच्या जिओ फोनची बाजारात मोठी प्रतीक्षा आहे. या फोनमध्ये व्हॉट्सअप चालणार नाही, हे ऐकून अनेकांची निराशा झाली. मात्र जिओ फोन खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण या फोनमध्ये जिओ स्पेशल व्हॉट्सअॅप व्हर्जन देणार असल्याची माहिती आहे.
जिओ फोन हा सर्वात स्वस्त 4G फोन आहे. शून्य रुपये किंमतीचा हा फोन 1500 रुपये अनामत रक्कम ठेवून खरेदी करता येईल. 24 ऑगस्टपासून या फोनसाठी बुकिंग सुरु होणार आहे.
जिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही, असं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. त्यामुळे हा फोन खरेदी करु इच्छिणाऱ्यांची मोठी निराशा झाली. मात्र 'फॅक्टर डेली'च्या वृत्तानुसार जिओ या फोनसाठी एक स्पेशल व्हर्जन तयार करणार आहे.
जिओ आणि व्हॉट्सअॅप यांच्यात या मेसेंजरचं लाईट व्हर्जन तयार करण्यासाठी प्राथमिक चर्चा सुरु असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्या जिओ फोनला सपोर्ट करणारं व्हर्जन तयार करतील, असा अंदाज लावला जात आहे.
जिओ फोनसाठी व्हॉट्सअॅप तयार करण्यासाठी काही तांत्रिक आव्हानं आहेत. त्यामुळे जिओ फोनला सपोर्ट करणारं व्हर्जन तयार करावं लागेल, असं जिओच्या सूत्रांनी सांगितलं आहे.
जिओ फोनवर व्हॉट्सअॅप सपोर्टिव्ह का नाही?
रिलायन्सचा जिओ फोन फायरफॉक्सच्या फोर्क्ड व्हर्जनच्या kiaOS वर चालणार आहे. मात्र व्हॉट्सअॅप या सिस्टमला सपोर्ट करत नाही. त्यामुळे जिओ फोन ग्राहकांना व्हॉट्सअॅप द्यायचं असेल तर रिलायन्सला स्पेशल व्हर्जन आणावं लागणार आहे.
जिओचा फोन कसा बुक कराल?
जिओ फोन 15 ऑगस्ट रोजी रोल आऊट होईल. मात्र या फोनचं प्री बुकिंग 24 ऑगस्टपासून Myjio App वर किंवा रिलायन्स स्टोअरमध्ये जाऊन करता येईल. ‘पहिला येईल त्याला प्राधान्य’ या तत्वावर सप्टेंबरपासून या फोनची प्रत्यक्ष विक्री सुरु होईल. म्हणजेच जो ग्राहक अगोदर फोन बुक करेन, त्यालाच अगोदर फोन मिळेल.
जिओ फोन कसा आहे?
रिलायन्सने जिओप्रमाणे आज आणखी एक धमाका केला आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्सचा 4G VoLTE फीचर फोन लाँच केला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा फोन फुकटात मिळणार आहे. मात्र त्यासाठी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 1500 रुपये ठेवावे लागतील. हे 1500 रुपये तीन वर्षांनी परत मिळतील.
जिओचा हा फोन टीव्हीला जोडता येणार आहे.
याशिवाय जिओने 153 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. जिओ फोनवर अवघ्या 153 रुपयात महिनाभरासाठी अनलिमिटेड कॉलिंगसह, अनलिमिटेड डेटा मिळणार आहे.
रिलायन्सची आज नवी मुंबईत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत मुकेश अंबानींनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. यापैकी महत्त्वाची घोषणा म्हणजे रिलायन्स जिओचा 4G VoLTE फीचर फोन.
संबंधित बातमी :
‘डेटागिरी’नंतर डिजीटल फ्रीडम, अंबानींकडून घोषणांचा पाऊस
भरसभेत कोकिलाबेन यांना अश्रू अनावर!
रिलायन्सचा धमाका, फुकटात 4G फोन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
राजकारण
क्रीडा
Advertisement