एक्स्प्लोर
'जिम्मकी कमल' यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडीओंमध्ये
ऑगस्टमध्ये अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास दोन कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
मुंबई : सरत्या वर्षाला अलविदा करत असताना यूट्यूबने भारतात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या टॉप टेन व्हिडिओज् ची यादी जाहीर केली आहे. बाहुबली आणि मर्सल हे चित्रपट यादीतील अव्वल व्हिडिओ ठरले असून केरळच्या महाविद्यालयात प्राध्यापिका आणि महिला कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या डान्सचा व्हिडिओ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
ऑगस्टमध्ये अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास दोन कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ऑगस्ट महिन्यात ओणमनिमित्त केरळमधल्या इंडियन स्कूल ऑफ कॉमर्स महाविद्यालयातील प्राध्यापिका आणि महिला कर्मचाऱ्यांनी 'जिमक्की कमल' या गाण्यावर हा डान्स व्हिडिओ तयार केला. पारंपारिक साडी नेसून केलेल्या या नृत्याला नेटिझन्सची पसंती मिळाली आहे. हा व्हिडिओ पाहताना तुम्हालाही ठेका धरल्याशिवाय राहवणार नाही.
इद शरनचा 'शेप ऑफ यू', 'आप की अदालत'मध्ये क्वीन कंगना राणावतने दिलेली मुलाखत, बीबी की वाईन्स, कॉमेडियन झाकिर खानचा स्टॅण्डअप कॉमेडी अॅक्ट यांचाही टॉप टेनमध्ये समावेश आहे. रांगोळी, मेहंदी यांचे ट्यूटोरियल व्हिडिओजही या यादीमध्ये आहेत. Until We Will Become Dust हा जगभरात सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडिओ ठरला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement